Close

फारच फिल्मी आहे महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची लव्हस्टोरी, आई सिनेमाच्या सेटवर झालेली ओळख (Mahesh Manjrekar And Medha Manjrekar Mate On Aai Movie Set, Know Their Filmy Lovestory)

मेधा मांजरेकर यांच्याशी महेश यांनी दुसरे लग्न केले होते. एका सिनेमाच्या सेटवर त्यांनी मेधा यांना पाहिले आणि त्यांच्या प्रेमात पडले. त्यांची लव स्टोरी ही अगदी फिल्मी आहे. आज मेधा मांजरेकर यांचा ५६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची व महेश यांची लव स्टोरी जाणून घेऊ.
१९९५ मध्ये महेश मांजरेकर त्यांच्या आई या सिनेमाचे काम करत असताना सेटवर मेधा मांजरेकर आल्या होत्या. त्यांना पाहता क्षणी ही मुलगी आपल्या सिनेमात असावी असं महेश यांच्या मनात आलं. त्यामुळे अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी मेधाचा फोन नंबर मागितला. परंतु नीना कुलकर्णी यांनी महेशला त्या मुलीचा चित्रपटाशी आणि अभिनयाशी काहीही संबंध नाही असे स्पष्टच सांगितलं. पण मेधा महेश यांच्या इतक्या नजरेत भरल्या होत्या की काहीही झालं तरी त्यांनी आपल्या सिनेमात काम करावच असा त्यांचा हट्ट होता.

त्यासाठी त्यांनी मेधा यांचा नंबर शोधला आणि त्यांना फोन लावून चित्रपटाबद्दल सांगितले. महेश मांजरेकर यांनी ठेवलेले सिनेमाचे प्रपोजल ऐकून मेधा यांनी त्यांना एक अट घातली आणि त्यानंतरच आपण चित्रपट करू असं म्हटलं. महेश यांचा फोन आला तेव्हा युरोप टूरवर होत्या त्यामुळे आपण टूरवरून आल्यानंतरच शूटिंगला सुरुवात करणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे मेधा यांच्यासाठी महेश मांजरेकर यांनी सिनेमाचा शूटिंग पुढे ढकललं.

त्यानंतर मेधा युरोप वरून आल्यावर सिनेमाचा शूटिंग सुरू झालं. हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढू लागली आणि मग ते प्रेमात पडले. खरे तर मेघा आणि महेश दोघेही आधीपासून विवाहित होते. पण त्यांचा घटस्फोट त्यानंतर दोघांनी लग्न केले आणि दोघांना सई मांजरेकर ही मुलगी झाली. पहिल्या लग्नापासून मेधा यांना एक मुलगी आहे तर महेश यांना दोन मुलं आहेत.

Share this article