सध्या 'झलक दिखला जा' या डान्स शोच्या ११ व्या सीझनमध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखवून मनीषा राणीने प्रेक्षकांची मनं जिंकली. बिग बॉस ओटीटी २ पासूनच तिच्या चाहत्या वर्गात वाढ झालेली. आता मनीषाशी संबंधित एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोत मनिषा हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे दिसते.
फोटोत मनीषाची हालत फारचं बिकट दिसते. तसेच तिला हातावर सलाइन लावले आहे. मनीषाचा फोटो पाहिल्यापासून चाहते ती बरी होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.
व्हायरल मनीषाच्या फोटोसोबत एक नोट लिहिली आहे. त्यात लिहिले की, मला तुझा रोजचा स्ट्रगल माहित आहे. तू झलक दिखला जा मध्ये तुझे नेहमीच सर्वोत्तम देतेस. आता तुझी शारिरीक ताकद खूपच कमी झाली आहे. पण आम्हांला माहित आहे की तू लवकर पुन्हा नव्या दमाने येशील, कारण मी १२-१५ तासांच्या रिहर्सल दरम्यान तुझी मेहनत पाहिली आहे. मनीषा, लवकर बरी हो.
मनीषा 'झलक दिखला जा'साठी सतत डान्स रिहर्सल करत होती. यामुळे, तिची शारिरीक क्षमता कमजोर झाली. जास्त रिहर्सलचा तिच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.
मनीषा राणी 'झलक दिखला जा ११' च्या पुढील काही एपिसोडमध्ये दिसणार नाही असे सांगण्यात येत आहे.