मनीषा राणीला 'क्वीन ऑफ हार्ट्स' म्हणूनही ओळखले जाते. तिने आपल्या चाहत्यांची मनंही जिंकून घेतली. तिचा स्वभाव प्रेक्षकांना आवडतो. मनीषाने अलीकडेच डान्स रिॲलिटी शो 'झलक दिखला जा ११' जिंकला. मनीषा राणीने नुकतंच व्लॉगमध्ये 'झलक दिखला जा ११' मध्ये जिंकलेली बक्षीसाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याचे सांगितले.
व्लॉगमध्ये, मनीषा राणीने तिचा मित्र महेश केशवालाशी संवाद साधला. त्यात दोघं चहाचं दुकान उघडण्याबदद्ल बोलत असतात. तेव्हा मनीषा गंमतीत महेश ते दुकान चालवेल असं म्हणते. तेव्हा ठुगेश म्हणतो की मनीषा 'झलक दिखला जा ११' जिंकली आहे, त्यामुळे तिनेच ते दुकान उघडावे. मनीषा म्हणाली, 'झलकची बक्षीसाची रक्कम अजून मिळालेली नाही.' ती पुढे म्हणाली, 'ते अर्धे कापतील.'
'झलक दिखला जा ११' मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एण्ट्री
मनीषा राणी 'झलक दिखला जा ११' मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली होती. उत्कृष्ठ परफॉर्मन्समुळे ती त्या सीझनची विजेती ठरली त्यासाठी तिला ३० लाखांचे बक्षीसही मिळाले. फराह खान, मलायका अरोरा आणि अर्शद वारसी 'झलक दिखला जा ११' मध्ये परीक्षक होते.
'बिग बॉस OTT २' मध्ये मनीषा राणी
रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी २' मध्ये दिसल्यानंतर मनीषा राणी प्रसिद्ध झाली. तिथे तिला मोठा चाहतावर्ग मिळाला. संपूर्ण शोमध्ये, मनीषाने अभिषेक मल्हानसोबत घट्ट नाते निर्माण केले. त्यांच्या चाहत्यांना त्यांची मैत्री आवडू लागली. 'झलक दिखला जा ११' मध्ये येण्यापूर्वी मनीषाने अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत.