सध्या आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु आहे. यंदा एक मराठमोळी अभिनेत्री आयपीएलचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
आयपीएलचा १७वा हंगाम सुरु आहे. अन् पहिल्या दिवसापासून आयपीएल पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी होताना दिसत आहे. तसेच आयपीएलचे सूत्रसंचालन हे हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तीन भाषांमध्ये होताना दिसत आहे. मराठी भाषेसाठी काही दिग्गज मराठी कलाकार आणि खेळडूंना घेतले जाते. आयपीएलच्या १७ व्या हंगामासाठी एका मराठमोळ्या अभिनेत्रीवर सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर सूत्रसंचालन करतानाचा अनुभव शेअर केला आहे. चला जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे...
आयपीएलच्या १७व्या हंगामाचे सूत्रसंचालन करणारी ही मराठमोळी अभिनेत्री 'देवमाणूस' या मालिकेत काम करणारी ऐश्वर्या नागेश आहे. तिने केदार जाधव, जयदेव उनादकट यांच्यासोबत आयपीएलचे होस्टिंग केले आहे. तिने हा एक वेगळा अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
'देवमाणूस' ही झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. मालिकेत ऐश्वर्या नागेशने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिची अपर्णा ही भूमिका मालिका बंद झाल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेनंतर ऐश्वर्याला आयपीएल होस्ट करण्याची संधी मिळाली आहे. तिने या आयपीएल होस्ट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
ऐश्वर्याने काही नाटकांमध्ये काम केले आहे. पण 'देवमाणूस' या मालिकेने ऐश्वर्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचता आले. आता ऐश्वर्या आयपीएलच्या १७व्या हंगामाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.