Close

अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा! शेअर केले जोडीदारासोबतचे खास फोटोज (Marathi Actress Pooja Sawant Secretly Engage Share Photo With Husband)

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईचा मौसम सुरू झाला आहे. नुकतीच अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे लग्नबंधनात अडकले. तर दुसरीकडे अभिनेत्री स्वानंद टिकेकर देखील लवकरच लग्न करणार आहे. अशातच निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंतने आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.

पूजा सावंतने नुकतंच इन्स्टाग्रामवर “We are engaged…” असं म्हणत सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री पूजा सावंतनं गुपचूप साखरपुडा उरकला आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर केलेत आहेत. त्यातील एका फोटोमध्ये तिच्या हातात अंगठी घातलेली दिसत आहे.

पूजाने तिच्या पोस्टमध्ये “माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. We are engaged”, असे म्हटले आहे.

पूजाने सलग तीन इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील सर्व फोटोत तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे पूजाचा होणारा नवरा कोण, अशी चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान पूजाच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार यावर कमेंट करताना दिसत आहेत. हेमंत ढोमे, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, पुष्कर जोग यांसह अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this article