Close

‘कान फेस्टिव्हल २०२४’ मध्ये सिद्धार्थ जाधवच्या ‘या’ मराठी सिनेमाचं स्क्रिनिंग झालंय… अभिनंदन! (Marathi Flag In Cannes Screening Of Siddharth Jadhav This Movie)

सध्या सर्वत्र 'कान फिल्म फेस्टिव्हल २०२४' गवगवा सुरू आहे. १४ मेपासून सुरू झालेला हा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' २५ मेपर्यंत असणार आहे. कान्स फेस्टिवलमध्ये देश-विदेशातील अनेक मोठ-मोठे कलाकार हजेरी लावत आहेत. या फेस्टिवलमध्ये मराठीचाही झेंडा रोवला जाणार आहे. नुकतीच सिद्धार्थने यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सिद्धार्थ जाधवचा 'हजार वेळा शोल पाहिलेला माणूस' चित्रपट दाखवण्यात आला. याचबरोबर १९ मेला देखील हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यासंदर्भात पोस्ट करत सिद्धार्थने लिहिलं,'' #आपलामराठीसिनेमा 'कान फिल्म फेस्टिव्हल'बद्दल खूप वेळा ऐकलं होतं. जेव्हा जेव्हा इथे आपला 'मराठी सिनेमा' गेलाय तेव्हा तेव्हा अभिमान वाटायचा. 'कान फिल्म फेस्टिव्हल २०२४'मध्ये 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाचे स्क्रीनिंग होत आहे आणि मी त्या सिनेमाचा भाग आहे. खूप आनंद झाला आहे.'''कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जिथे जगभरातून गौरविलेले सिनेमे येतात आणि बघितले जातात…तिथे आपल्या 'मराठी सिनेमाचं स्क्रीनिंग होत आहे याचा मला खूप आनंद आहे…धन्यवाद 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' चित्रपटाची टीम. खूप छान वाटतंय. असंच प्रेम ठेवा. हा सिनेमा लवकरात लवकर तुमच्यासमोर सादर व्हावा याची मी आतुरतेने वाट पाहतोय…लव्ह यू…थँक्यू...''

सिद्धार्थची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत सिद्धार्थचं अभिनंदन केलंय. एकाने कमेंट करत लिहीलंय की, खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे सिद्धार्थ..... खरोखरच सिद्धार्थ तुझ्यासाठीच नव्हे तर आमच्यासाठीही ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. पुनःश्च अभिनंदन चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/