Close

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ऋषिकेश-जानकीचा विवाहसोहळा थाटात साजरा होणार : संगीत सोहळ्यात छोट्या उस्तादांची खास हजेरी (Marriage Anniversary Of Hrishikesh – Janaki To Be Celebrated Like Grand Wedding Ceremony In Series, ‘Gharoghar Matichya Chuli’)

स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी-ऋषिकेशच्या लग्नाची धामधूम सुरु झाली आहे. जानकी-ऋषिकेशच्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण रणदिवे कुटुंबाने मिळून पुन्हा एकदा दोघांच्याही लग्नाचा घाट घातलाय. मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता लगबग सुरु आहे ती संगीत सोहळ्याची. जानकी-ऋषिकेशने संगीत सोहळ्यासाठी फिक्का जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. संगीत सोहळ्यात जानकी-ऋषिकेशच्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे. त्यामुळे रणदिवे कुटुंब जानकी-ऋषिकेशच्या रंगात रंगून गेलं आहे.

रणदिवे कुटुंबासोबतच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील नित्या-अधिराज, अंकुश-अबोली, साधी माणसं मालिकेतील सत्या मीरा आणि वैशाली सामंतसोबत छोट्या उस्तादांनी देखिल खास हजेरी लावली आहे.

Share this article