स्टॅने आपल्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात लिहिलेले की, मी रॅपिंग सोडणार आहे. त्याच्यापुढे त्याने रेड हार्ट इमोजीही शेअर केला होता. स्टॅनच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा असून त्याचे चाहते मात्र चिंतेत होते. पण कालांतराने त्याने ती पोस्ट डिलीट केली.
एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. स्टॅनने वयाच्या १२ व्या वर्षी कव्वाली गाण्यास सुरुवात केली. त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म केले आहे. स्टॅनने अनेक गाणी गायली असली तरी त्याला लोकप्रियता 'वाता' या गाण्याने मिळाली, ज्याला यूट्यूबवर सुमारे २१ मिलियन व्ह्यूज मिळाले.
एमसी स्टॅनचा जन्म पुण्यातील अत्यंत गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. सुरुवातीला, त्याला कुटुंब आणि लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले कारण स्टॅन अभ्यासापेक्षा गाण्यावर आणि रॅपवर अधिक लक्ष केंद्रित करायचा. एक काळ असा होता की स्टॅनकडे पैसेही नव्हते त्यामुळे त्याला रस्त्यावर रात्र काढावी लागली. पण स्टॅनने हिंमत सोडली नाही. जे लोक आधी एमसी स्टॅनकडे तुच्छतेने बघायचे, ते आज त्यांची स्तुती करताना थकत नाहीत. एमसी स्टॅनने त्यांच्या गाण्यांमधून त्याच्या आयुष्याची कहाणी सांगितली आणि लोकांचा दृष्टीकोन बदलला.