अभिनेत्री मीरा चोप्रा लवकरच संसार थाटणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. फेब्रुवारीमध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार आहे. एवढेच नाही तर अभिनेत्रीच्या लग्नाचे विधी राजस्थानमध्ये होणार आहेत. काही दिवसांपूर्वी मीरा कोणालातरी डेट करत असल्याची बातमी आली होती. आता तिच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत.
यापूर्वी अभिनेत्रीचे लग्न मुंबईत होणार असल्याचे बोलले जात होते. पण समोर येत असलेल्या माहितीनुसार हे लग्न मुंबईत नाही तर राजस्थानमध्ये होणार आहे. मीराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मीरा सध्या तिच्या आगामी 'सफेद' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमधून सुटका होताच ती विवाहस्थळ ठरवण्यासाठी राजस्थानला रवाना होणार आहे.
मीराच्या लग्नाची जोरात तयारी तर सुरू झाली आहे. परंतु लग्नाची तारीख अजून नक्की व्हायची आहे. शिवाय मीरा कोणाला डेट करत आहे, त्या व्यक्तीबाबतची माहिती देखील अजून गुलदस्त्यात आहे. रिपोर्टनुसार तिचा बॉयफ्रेंड फिल्म किंवा टीव्ही माध्यमाशी निगडीत नसल्याचे कळते.
मीराच्या आगामी 'सफेद' चित्रपटाबद्दल सांगायचं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन संदीप सिंह यानेच केले आहे. चित्रपट २९ डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म जी ५ वर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मीराने सफेद चित्रपटातील तिचा फस्ट लूक सोशल मीडियावर दर्शविला होता. त्यावेळेस मनोज वाजपेयी यांनी तिची प्रशंसाही केली होती. मनोज वाजपेयी यांनी या चित्रपटामध्ये वॉइसओव्हर देखील केले आहे.
(सर्व फोटो – सोशल मीडियाच्या सौजन्याने)