लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलैक सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे सतत चर्चेत असते. अभिनेत्री 9 महिन्यांची गर्भवती आहे. कधीही तिच्या मुलांला जन्म होऊ शकतो. अलीकडेच अभिनेत्रीने खुलासा केला होता की ती जुळ्या मुलांना जन्म देणार आहे रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला पालक होण्यासाठी खूप उत्सुक आहेत. आता रुबिनाच्या बाळांच्या स्वागतासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. तिने तिच्या जुळ्या बाळांसाठी एक खोली देखील सजवली आहे, ज्याची एक झलक तिने अलीकडे सोशल मीडियावर शेअर केली आहे.
रुबिना दिलैकने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या होणाऱ्या बाळांच्या खोलीच्या प्रत्येक कोपऱ्याची झलक दाखवली आहे. रुबिनाने आपल्या बाळाच्या खोलीला एक अनोखा टच देण्याचा प्रयत्न केला आहे. खोलीच्या सजावटीसाठी तिने पांढरी थीम निवडली आहे. तिने प्रत्येक भिंतीवर कार्टून कॅरेक्टर्स बनवली आहेत, कुठे प्राणी तर कुठे पक्षी, जे बाळाच्या खोलीला एक खास लुक देत आहेत.
इतकंच नाही तर पाळण्यापासून ते बेड आणि खेळण्यांपर्यंत - रुबिनाने आपल्या बाळांसाठी सगळ्या गोष्टी मोठ्या प्रेमाने निवडल्या आहेत. रुबिनाच्या आतल्या आईच्या भावनेची झलक खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात स्पष्टपणे दिसते. बाळाची खोली पाहून, अभिनेत्री आई होण्याबद्दल किती उत्साही आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
रुबिना गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत आहे आणि ती कधीही बाळांना जन्म देऊ शकते. तिची प्रसूती जवळ आल्याचे पाहून तिचे संपूर्ण कुटुंब - आई, बाबा, धाकटी बहीण आणि तिचा नवरा मुंबईला पोहोचले आहेत. बाळासाठी खोलीही तयार आहे. आता सर्वजण बाळांच्या स्वागताची वाट पाहत आहेत.