Close

मुफासा : द लायन किंगच्या हिंदी आवृत्तीसाठी शाहरुख, आर्यन आणि अबराम खान असं बाप लेकांचं त्रिकूट एकत्र येणार (‘Mufasa The Lion King’ Shah Rukh Khan Aryan Khan And Abram Khan Come Together To Voice For The Hindi Version)

जगभरात डिस्नेच्या ॲनिमेटेड फीचर फिल्म्सची क्रेझ खूप जास्त आहे. २०१९  मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द लायन किंग' या चित्रपटाचा प्रीक्वल 'मुफासा: द लायन किंग' हा याचा ताजा पुरावा आहे. अलीकडेच या चित्रपटाचा नवीन ट्रेलर मूळ भाषेतील इंग्रजीमध्ये प्रदर्शित करण्यात आला, जो जगभरातील लाखो लोकांनी पाहिला आणि पसंत केला. यानंतर या चित्रपटाचा हिंदी ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे, जो हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही खूप आवडला आहे.

विशेष म्हणजे शाहरुख खान, आर्यन खान आणि अबराम खान हे त्रिकूट ‘मुफासा : द लायन किंग’ या चित्रपटात डबिंग करणार आहेत.

एकदा जंगलाचा राजा बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा शाहरुख खान पुन्हा 'मुफासा'साठी डबिंग करणार असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे आर्यन खान 'सिम्बा' या व्यक्तिरेखेला आवाज देणार असून किंग खानचा धाकटा मुलगा अबराम खान 'यंग मुफासा'साठी डबिंग करणार आहे. पहिल्यांदाच पिता-पुत्र एका प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत. एकीकडे शाहरुख 'किंग' चित्रपटासाठी सुहाना खानसोबत काम करणार असल्याचं कळतंय. दुसरीकडे, आता किंग खान त्याच्या मुलांसोबतही आपले संबंध प्रस्थापित करण्यास तयार आहे.

या चित्रपटाच्या डबिंगबाबत शाहरुख म्हणाला, "मुफासा हे एक वेगळे वारसा असलेले पात्र आहे. तो जंगलाचा राजा आहे आणि त्याचा मुलगा सिम्बाचा तो मार्गदर्शकही आहे. एक पिता म्हणून तो आपल्या मुलासाठी सर्वकाही करतो. 'मुफासा: द लायन किंग'  या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना मुफासाच्या लहानपणापासून ते राजा बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलेला आहे. माझी दोन्ही मुले आर्यन आणि अबराम या चित्रपटाचा एक भाग असल्याने हा चित्रपट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.” हा चित्रपट यावर्षी २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. इंग्रजीशिवाय 'मुफासा: द लायन किंग' हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

(फोटो: इंस्टाग्राम)

Share this article