अभिनेत्री आणि नृत्यांगना मुक्ती मोहनने अलीकडेच एनिमल फेम अभिनेता कुणाल ठाकूरसोबत लग्न केले. इतक्या दिवसांनंतरही सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचे आणि लग्नाआधीच्या सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत. नुकतेच मुक्तीने तिच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मुक्तीने सिल्व्हर बॉर्डर असलेली हाफ स्लिप बॅकलेस चोली आणि पिवळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता. सोबतच त्यावर मॅचिंग ओढणीही घेतलेली.
अभिनेत्रीने स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून लेयर्ड नेकपीस, मॅचिंग मोत्याचे झुमके आणि मोठा मांग टिक्का परिधान केलेला आहे.
मेक-अपबद्दल बोलताना, अभिनेत्रीने एक शीन टच आणि अर्ध्या केसांचा बन बनवला. छोट्या मोत्याची टिकली लावलेली जी कपाळावर शोभून दिसत होती.
हळदी समारंभाच्या या फोटोंमध्ये मुक्ती मोहन तिच्या दोन बहिणी शक्ती, नीती मोहन, तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत पोझ देताना दिसत आहेत.
दुसर्या फोटोमध्ये, नववधू तिच्या बहिणी आणि मैत्रिणींसोबत सेल्फीसाठी पोज देत आहे.
एका फोटोमध्ये वधूची बहीण शक्ती मोहन वधूला काहीतरी खाऊ घालत आहे.
उर्वरित छायाचित्रांमध्ये मुक्तीचे कुटुंबीय मुक्तीच्या चेहऱ्यावर हळद लावताना दिसत आहेत. मुक्तीने सोशल मीडियावर संगीत रात्रीचे फोटो शेअर केले आहेत