मुनव्वर फारुकीला 24 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुनव्वरच्या मित्रानेच त्याच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना त्याच्या तब्येतीबद्दल माहिती दिली.नितीन मेंघानी याने Instagram वर ही माहिती दिली आहे. नितीन मेंघानीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर मुनव्वर हॉस्पिटलच्या बेडवर झोपला असल्याचा फोटो शेअर केला, त्याच्या हाताला IV सलाइन लावले होते. या फोटोसोबत त्याने लिहिले की, माझा भाऊ लवकरात लवकर बरा व्हावा एवढीच मी प्रार्थना करतो.
मुनव्वर फारुकीची तब्येतीसंबंधी सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यातही त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हा त्याने स्वत:चा आयव्ही ड्रिप लावल्याचा फोटोही शेअर केला होता. तेव्हा त्याने 'लग गई नजर' असे लिहून वारंवार होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती.
'बिग बॉस १७' चा विजेती ठरली
'बिग बॉस १७' च्या ग्रँड फिनालेमध्ये सर्वाधिक मते मिळवून मुनव्वर फारुकी विजेता ठरला होता. रोख रकमेसोबतच स्टँड-अप कॉमेडियनला एक आलिशान नवी कार आणि ट्रॉफीही मिळाली. अंतिम फेरीत अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अरुण मशेट्टी हे देखील होते. दरम्यान, स्टँड-अप कॉमेडियन, रॅपर आणि गायक मुनव्वरने नुकतेच त्याचे नवीन गाणे 'ढंडो' रिलीज केले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर हे त्याचे पहिलेच गाणे होते.