डोंगरीचा रहिवासी असलेल्या मुनव्वर फारूकीने रिॲलिटी शो 'बिग बॉस १७' विजेतेपद संपादन केले. २८ जानेवारीला हा महाअंतिम सोहळा पार पडला. रात्री उशिरा सलमान खानने यंदाच्या सीझनचा विजेता म्हणून मुनव्वरचे नाव घोषित केले. यानंतर मुनव्वर आणि त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. डोंगरीमध्येही उत्साहाचे वातावरण होते. फटाके फोडून मुनव्वरच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. आपल्या विजयाने मुनव्वर खूप आनंदी आहे. जिंकल्यानंतर त्याने पहिली पोस्ट शेअर केली आहे.
बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी म्हणाला, 'नक्कीच हा विजय खूप महत्त्वाचा होता. माणसाच्या आयुष्यात कोणताही खेळ, काम किंवा परिस्थितीतून बाहेर पडणे नेहमीच खूप महत्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही सन्मानाने बाहेर पडता तेव्हा सगळा प्रवास सार्थकी लागतो.
मुनव्वर फारुकी आणि ट्रॉफी
Trophy Dongri hi gyi. #MunawarFaruqui with the BB trophy pic.twitter.com/Qp1zLCHo1Z
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) January 28, 2024
३१ वर्षीय मुनव्वरने विजयानंतर सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर आहे. त्याने 'बिग बॉस १७' ची ट्रॉफी आणि सलमान खानसोबत पहिला फोटो शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये त्याने 'तुमच्या प्रेम आणि समर्थनासाठी खूप खूप आभार. अखेर ट्रॉफी डोंगरीमध्ये आली’ असे लिहिले आहे.
अभिषेक कुमार ठरला फर्स्ट रनर अप
मुनव्वर फारुकी या सीझनचा विजेता झाला आणि अभिषेक कुमार फर्स्ट रनर अप ठरला. मन्नारा चोप्रा दुसरी उपविजेती ठरली. अभिनेत्री अंकिता लोखंडेला टॉप ३ मध्ये स्थान मिळवता आले नाही. ती टॉप ४ मध्येच बाहेर पडली.
नाराज दिसली अंकिता
फिनालेनंतरचा अंकिता लोखंडेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूप नाराज आणि अस्वस्थ दिसत आहे. सोबतच तिच्या चेहऱ्यावर थकवाही स्पष्ट दिसतो.
हे स्पर्धक शोमध्ये दिसले
या शोमध्ये टॉप ५ मध्ये आलेल्या स्पर्धकांव्यतिरिक्त ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालवीय, समर्थ जुरेल, अनुराग डोवाल आणि खानजादी यांसारख्या स्पर्धकांनी महाअंतिम सोहळ्याला उपस्थिती लावलेली.