Close

श्रीगणेशाला वंदन करणारी ‘गणराया’ ही लावणी प्रदर्शित : संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या ‘लावण्यवती’ अल्बमचा नवा प्रयोग (Music Composer Avadhoot Gupte Releases New Album With The Lavni Of Shree Ganesh)

लावणीवर ठेका धरायला, त्यात धुंद व्हायला अनेकांना आवडतं. असाच लावणीचा खजिना घेऊन अवधूत गुप्ते संगीतप्रेमींच्या भेटीला येणार आहेत. 'लावण्यवती' हा त्यांचा नवीन अल्बम आज भेटीला आला आहे. एकविरा म्युझिक तर्फे प्रदर्शित झालेल्या ‘लावण्यवती‘ ह्या अल्बमचा एक टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता.  यातील घुंगरांचा नाद, ढोलकीचा ताल आणि नर्तिकांच्या नजाकतींमुळे या अल्बमविषयीची उत्सुकता प्रचंड वाढली होती.

आता ह्या 'लावण्यवती'तील पहिली लावण्यलतिका लावणीप्रेमींच्या भेटीला आली असून 'गणराया' ही श्रीगणेशाला वंदन करणारी पहिली लावणी प्रदर्शित झाली आहे.

ह्यात नृत्यांगना भार्गवी चिरमुले आपल्या अदाकारीने भुरळ घालताना दिसत आहे. व्हिडिओचे नृत्य दिग्दर्शन सिद्धेश दळवी ह्यांनी केले आहे. अवधूत गुप्ते ह्यांनी संगीत दिलेल्या ह्या गाण्याची शब्दरचना देखील अवधूत गुप्ते ह्यांचीच असून वैशाली सामंत ह्यांनी हे गाणे गायले आहे. अनुराग गोडबोले ह्यांनी संगीत संयोजन केले असून, गुरु पाटील ह्यांनी संकलित केलेल्या या अल्बमची निर्मिती गिरिजा गुप्ते यांची आहे.

Share this article