सध्या गदर 2 सिनेमागृहांमध्ये धुमाकुळ घालत आहे. पहिल्या गदरप्रमाणेच गदर 2 देखील प्रेक्षकांना आवडला आणि त्यांनी तारा सिंग आणि सकिना यांच्यावर उघडपणे प्रेमाचा वर्षाव केला. पहिल्या गदरप्रमाणेच त्याची गाणीही खूप आवडली.
मैं निकला गड्डी लेकर आणि उड जा काले कवन ही दोन्ही गाणी चित्रपटात रिपीट झाली आहेत. पहिल्याच चित्रपटाला उत्तम सिंग यांनी संगीत दिले होते आणि यावेळी मिथुन यांनी संगीत दिले आहे पण गाण्यांची म्युझिक तशीच ठेवण्यात आली आहे. चित्रपटाला एवढं प्रेम मिळत असताना, उत्तम सिंग निर्मात्यांवर नाराज आहे.
अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत उत्तम सिंग म्हणाले की, त्यांनी मला गदर 2 साठी बोलावले नाही. मला फोन करून काम विचारण्याची तस्दीही घेतली नाही. त्यांनी चित्रपटात माझी दोन गाणी वापरली आहेत. चित्रपटात माझे स्वतःचे पार्श्वसंगीत देखील वापरले आहे. माझी गाणी वापरण्यापूर्वी एकदा तरी मला विचारण्याची पद्धत त्यांच्यात असायला हवी होती.
उत्तम सिंह यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी या दरम्यान चित्रपटाने ४०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला असून यशाचे नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत.
उत्तम सिंग यांच्याबद्दल सांगायचे तर ते ज्येष्ठ संगीतकार आहेत आणि त्यांनी दिल तो पागल है, पिंजर यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले आहे.