Close

‘नाच गो बया’ गाण्याची भुरळ, पूजा सावंतसह अक्षया नाईक आणि आकांक्षा गाडेची धमाकेदार परफॉर्मन्स (‘Nach Go Baya’Song, Pooja Sawant along with Akshaya Naik and Akanksha Gade’s explosive performance)

आई, मुलगी, बहीण, पत्नी, प्रेयसी व मैत्रिण अशा निरनिराळ्या रूपात आपण स्त्रीला ओळखतो खरे; परंतु, स्रीचे रूप एवढ्यापुरतेच मर्यादित नाही तर या स्त्रीत्वाची व्याख्या याहीपेक्षा अधिक मोठी आहे. स्त्रीचा आदर सन्मान करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. स्त्री ही कायम कर्तव्याचं ओझं घेऊनच जगत आली आहे. अशातच नारी वर्गाला गवसणी घालायला एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तर ताई, माई आणि अक्का आपल्या हक्काच्या या नव्या 'नाच गो बया' या गाण्यातून थिरकायला सज्ज व्हा.

प्रत्येक महिलेला तिच्या कामातून, त्रासातून वेळात वेळ काढत एक दिवस स्वतःसाठी जगायला लावण्यास भाग पाडायला अभिनेत्री पूजा सावंत येतेय. तर पूजाला या गाण्यात अक्षया नाईक, आकांक्षा गाडे, ताश्वी भोईर, निक शिंदे आणि आयुष संजीव साथ देत आहेत. महिलांसाठी पारंपरिक कार्यक्रम आयोजित असलेल्या या गाण्यात सगळेच धुडगूस घालताना दिसत आहेत. 'लयभारी म्युझिक' आणि 'माऊली फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'नाच गो बया' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. सुप्रसिद्ध संगीतकार प्रशांत नकती यांनी या गाण्याची संगीताची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलवली आहे. दिग्दर्शनात प्रशांत यांचं पदार्पण असून या गाण्याची कन्सेप्टही त्यांची आहे.

तर हे सुंदर अस गाणंदेखील त्यांनी शब्दबद्ध केलं आहे. याआधीही प्रशांत यांच्या प्रत्येक गाण्याने लोकप्रियता मिळवत मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठला. आता 'नाच गो बया' या गाण्यातून त्यांनी प्रत्येक महिलेला स्वतःसाठी एक दिवस जगायला भाग पाडलं आहे. अनिल पाटील यांनी गाण्याच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर प्रशांत यांच्याबरोबर संकेत गुरव यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर रोहित राऊत व मुग्धा कऱ्हाडे यांनी त्यांच्या दमदार आवाजाtत हे गाणं गायलं आहे. या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन राहुल गायकवाड याने केलं आहे. तर नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील, चेतन महाजन यांनी हे गाणं कोरियोग्राफ केलं आहे.

या गाण्यातून प्रेक्षकांच्या लाडक्या पूजा सावंतला थिरकताना पाहणं साऱ्यांना थक्क करुन सोडणार आहे. आयुष संजीव व निक शिंदे आयोजित महिलांसाठीच्या पारंपरिक कार्यक्रमात पूजाने चारचाँद लावले. पूजाने या गाण्याबाबतचा अनुभव सांगत म्हटलं की, "स्त्री या विषयावर आधारित असलेल्या या गाण्यात मला नृत्य करायची संधी मिळाली ही खूप अभिमानास्पद बाब आहे. महिला हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणूनच सर्व महिलांना त्यांच्या कामातून एक दिवस सुट्टी मिळावी आणि त्यांनी त्यांचा तो दिवस जगावा अशी माझी इच्छा आहे त्यामुळे प्रत्येक महिला या गाण्यावर थिरकत तिचा तो दिवस साजरा करेल याचीही मला खात्री आहे". 'नाच गो बया' हे गाणं 'लयभारी म्युझिक' या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झालं आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/