नमाशी चक्रवर्तीने आतापर्यंत फक्त एकाच चित्रपटात काम केले आहे, पण त्यानंतरही त्याचा संघर्ष संपलेला नाही. त्याला सतत ऑडीशन द्याव्या लागतात. नमाशी चक्रवर्तीने 'बॉलीवूड ठिकाना'ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या संघर्षाबद्दल तसेच ओरीच्या प्रसिद्धीबद्दल भाष्य केले. आपण भाड्याने कपडे घेतले आणि पापाराझींसाठी पोज दिल्या, तरीही काम मिळाले नाही अशी खंत नमाशीने बोलून दाखवली.
इतर स्टार किड्सप्रमाणे पापाराझींसमोर का येत नाही, यावर नमाशी म्हणाला, 'मी महिनाभर यासाठी प्रयत्न केले. मी कपडे भाड्याने घ्यायचो आणि पोझ द्यायचो, पण तरीही मला काही काम मिळत नव्हते, म्हणून मी तसे करणे थांबवण्याचा निर्णय घेतला.
'गेल्या आठवड्यातील घडलेली एक गोष्ट सांगतो. मी सोहो हाऊसमध्ये बसलो होतो आणि माझ्या मित्राने मला विचारले की मी पोटापाण्यासाठी काय करतो. तर मी म्हणालो की मी एक अभिनेता आहे आणि मिथुन चक्रवर्तींचा मुलगा आहे. त्यानंतर त्याने माझा सोशल मीडिया पाहिला आणि विचारले, 'भाई, तू ओरीचा मित्र आहेस का?'
मित्राच्या या प्रश्नाने नमाशी आश्चर्यचकित झाला. त्यानंतर तो म्हणाला, 'हीरो बनण्यासाठी मला कोणत्या संघर्षातून जावे लागलेले याचा मी विचार केला. मी एका मोठ्या स्टारचा मुलगा असूनही तीन वर्षे सहन केलेला संघर्ष आठवला. आणि इथे एक व्यक्ती जो नुसता पाऊट घेतो, सेल्फी घेतो आणि लोक त्याला माझ्यापेक्षा जास्त ओळखतात. यामुळे मी तणावाखाली आहे. कदाचित मला अधिक चर्चेत असणे आवश्यक आहे. मलाही ओरीसारखे प्रसिद्ध व्हायचे आहे. पण मला अशी प्रसिद्धी नको आहे.
नमाशी चक्रवर्तीने राजकुमार संतोषी यांच्या 'बॅड बॉय' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते, हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता.