Close

फॅनला मारल्याबद्दल नाना पाटेकर यांचा माफीनामा, सांगितलं खरं कारण (Nana Patekar Apology on Viral Video)

‘नटसम्राट’, ‘क्रांतीवीर’, ‘तिरंगा’, ‘प्रहार’, ‘शक्ती’ यांसारख्या असंख्य सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे अभिनेते नाना पाटेकर वयाच्या ७२ व्या वर्षी देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. दरम्यान, नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सेल्फी घ्यायला आलेल्या एका फॅनला नाना पाटेकर यांनी मारल्याचं दिसलं. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी नाना पाटेकर यांच्यावर निशाणा साधला. पण आता व्हायरल व्हिडीओवर खुद्द नाना पाटेकर यांनी मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नाना पाटेकर यांची चर्चा रंगली आहे.

नाना पाटेकरांचा माफीनामा, सांगितलं खरं कारण

नाना पाटेकर म्हणतात, 'एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी एका मुलाला मारल्याचं दिसतंय. हा सीन करणं आमच्या चित्रपटाचा भाग आहे, आमची रिहर्सल सुरु होती. त्यावेळी दिग्दर्शकाने या सीनची फायनल रिहर्सल करायला सांगितली. व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा आला तेव्हा आम्ही रिहर्सलला सुरुवात करणार होतो.

नाना पाटेकर पुढे म्हणाले, 'मला माहित नव्हते की तो कोण होता? मला वाटले की तो आमच्या क्रूपैकी एक आहे, म्हणून मी त्याला रिहर्सलनुसार त्याला मारलं आणि त्याला निघून जाण्यास सांगितले. नंतर मला कळले की तो क्रूचा भाग नव्हता, म्हणून मी त्याला परत बोलावले, पण तो पळून गेला. हा व्हिडिओ त्याच्या मित्राने शूट केला असण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/tolly_hub/status/1724694031555493987?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1724694031555493987%7Ctwgr%5Ee8cec6aa28cb28614d1f8654e322fa5d77271b77%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmanoranjan%2Fnana-patekar-apologizes-for-hitting-fan-says-i-misunderstood-journey-fim-drj96

नाना पाटेकर म्हणाले, 'मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार दिला नाही. मी असे कधीच केले नसते...जे काही झाले ते चुकून झाले. काही गैरसमजांमुळे हे घडले. मला क्षमा करा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही'.

नाना पाटेकर यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांना नाराजी सहन करावी लागली. अखेर त्यांनी जाहीर माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला असं म्हणता येईल.

नाना पाटेकर सध्या वाराणसीत 'जर्नी' चित्रपटाचं शुटींग करत आहेत. 'गदर 2' फेम दिग्दर्शक अनिल शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. नाना पाटेकर व्यतिरिक्त अभिनेता उत्कर्ष शर्मा देखील 'जर्नी' मध्ये दिसणार आहे.

Share this article