Close

तृप्ती डिमरीची पुष्पा २ मध्ये एण्ट्री, २ नॅशनल क्रश एकमेकांना भिडणार ( Nantional Crushes Rashmika Mandanna And Tripti Dimri Work Together In Pushpa 2)

सिनेमाचे चाहते त्यातील दुसऱ्या गाण्याची वाट पाहत असतानाच आता चित्रपटात  मोठी एन्ट्री झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे अडीच महिने उरले आहेत. 'पुष्पा : द राइज' प्रमाणेच यावेळीही यात आयटम साँग असेल. मात्र, यावेळी समंथा रुथ प्रभू या त्यात थिरकताना दिसणार नाही. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटणी या सिनेमात खास डान्स करणार असल्याचे बोलले जात होते.

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' मध्ये भाभी २ ची एन्ट्री!

Telugu360.com चा एक रिपोर्ट नुसार, चित्रपट रिलीज होण्याआधीच दिग्दर्शक सुकुमार काहीतरी मोठे प्लॅन करत आहेत. चित्रपटातील एका आयटम नंबरसाठी प्लॅनिंग सुरू आहे. यासाठी अनेक अभिनेत्रींच्या नावाचा विचार केला जात होता. दरम्यान, निर्मात्यांनी 'ॲनिमल'च्या भाभी 2 म्हणजेच ​​तृप्ती डिमरीला आयटम नंबरसाठी घेतल्याचे बोलले जात आहे.

'पुष्पा : द राइज'चे हे गाणे जूनमध्ये शूट होणार आहे. शूटसाठी खास सेट तयार केला जात आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात, सामंथाने ऊ अंतवामध्ये अप्रतिम डान्स केलेला. 'पुष्पा २' मधील आयटम नंबरसाठी पूर्वीपेक्षा जास्त तयारी केली जात आहे. या आयटम नंबरसाठी दिशा पटानी नव्हे तर तृप्ती डिमरीचे नाव फायनल करण्यात आले आहे. देवी श्री प्रसाद यांनी आयटम नंबरसाठी एक अप्रतिम गाणे तयार केले आहे.

Share this article