गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, हार्दिक याच्यासोबत लग्न करण्याआधी नताशा हिने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. एका एक्स-बॉयफ्रेंडसोबत तर अभिनेत्री अनेक महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये देखील होती. सध्या सर्वत्र नताशा हिच्या एक्स-बॉयफ्रेंड्सची देखील चर्चा रंगली आहे.
नताशा बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह याच्यासोबत देखील रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण दोघांनी देखील कधीच सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला नाही.
अभिनेता अली गोनी याच्यासोबत देखील नताशा रिलेशनशिपमध्ये होती. रिपोर्टनुसार दोघे अनेक महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये देखील राहिले होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
रिपोर्टनुसार, नताशा हिने श्रीमंत उद्योजक सॅम मर्चंट याला देखील डेट केलं आहे. पण दोघांनी कधीच नात्यावर अधिकृत वक्तव्य केलं नाही. दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या असताना नताशा हिला ॲलेक्जेंडर याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. शिवाय आता अभिनेत्री एलेक्जेंडर याला डेट करत असल्याची दाट शक्यता नेटकऱ्यांनी वर्तवली आहे.
नताशा आणि हार्दिक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांना एक मुलगा देखील आहे. नताशा हिने सोशल मीडियावरून 'पांड्या' नाव काढल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.