बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य कायम चर्चेत असतात. सध्या बिग बी यांची नात नव्या नवेली नंदा हिचे सोशल मीडियावर बरंच कौतुक होत आहे. नव्या एक प्रसिद्ध स्टारकिड आहे. अन् असं असूनही ती कायम तिच्या खासगी आणि साध्या राहणीमानामुळे चर्चेत असते. नव्याला अनेकदा अत्यंत साध्या लूकमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीतही नव्याचा साधेपणा आणि समजूतदारपणा दिसून आला. या मुलाखतीत नव्याची हिंदी भाषेवर असलेली पकड पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. प्रत्येकजण नव्याचं कौतुक करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नव्या भविष्याबद्दल बोलताना दिसत आहे.
नव्या म्हणतेय, “मी कायम ऐकते की तुम्ही तरुण आहात तुमच्याकडे अनुभव नाही. तर तुम्ही कसं एखाद्या गोष्टीसाठी आणि एखाद्या क्षेत्रात काम करु शकता. तुम्हाला वैद्यकीय सेवा, कायदेशीर जागरूकता आणि घरगुती हिंसाचार याविषयी माहिती आहे का? पण माझे विचार वेगळे आहेत, जर एखादी गोष्ट करण्यासाठी मी ८० वर्षांपर्यंत थांबले तर देशाचं काय होईल. आमच्या पिढीचं काय होणार. देशातील ८० टक्के लोक हे आमच्या वयाचे म्हणजेच २० ते ३० तले आहेत… आणि त्यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे. असे असताना कोणतंही काम करण्यासाठी आम्ही पन्नाशीपर्यंत वाट का पाहायची?”
नव्याचे हे विचार खरोखर कौतुकास्पद आहेत. तिच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अन् सर्वत्र नव्याची चर्चा होत आहे. नव्याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओवर कमेंट करत एक युजर म्हणाला, ‘इतका चांगला विचार करणारी पहिली स्टारकिड’, तर दुसरा युजर म्हणाला, ‘असे सुजाण नागरिक ही देशाची गरज आहे…’
नव्या अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन यांची मुलगी आहे. श्वेता बच्चन यांनी १९९७ साली उद्योजक निखील नंदा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे. नव्या आणि अगस्त्य. अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘द अर्चिज’ सिनेमातून बिग बींचा नातू अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
(फोटो सौजन्य - @navyananda)