नवाजुद्दीनने आजवर अनेक सिनेमा, वेबसिरीजमधून भूमिका साकारुन लोकांच्या मनावर राज्य केले आहे. काही वर्षांपुर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारीत 'ठाकरे' सिनेमात त्याने खुद्द बाळासाहेबांची मध्यवर्ती भूमिका साकारली होती, जी लोकांनी डोक्यावर घेतली. आता पुन्हा एकदा नवाज एका बायोपीकमध्ये झळकणार आहे. काय आहे हा बायोपीक?
ठाकरे सिनेमानंतर नवाजुद्दीन आणखी एक बायोपीकमध्ये भुमिका साकारणार आहे. हा बायोपीक दिवंगत रिअल लाइफ कस्टम ऑफिसर कोस्टा फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटासाठी नवाजुद्दीनला साइन करण्यात आले आहे. सेजल शाह या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार दिवंगत कस्टम ऑफिसर कोस्टा फर्नांडिस यांच्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये नवाजुद्दीन प्रमुख भूमिका साकारणार आहे. नवाजुद्दीनच्या ‘सिरियस मॅन’ची निर्माती सेजल शाह हीच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. कोस्टा फर्नांडिस यांनी ९० च्या दशकात गोव्यातील सोन्याच्या तस्करीला आळा घातला होता. त्यांच्या याच एकूण कामगिरीवर हा चित्रपट बेतलेला असण्याची शक्यता आहे.
लवकरच गोव्यामध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. कोस्टा यांचं खासगी आयुष्य आणि इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा या बायोपिकमध्ये समावेश करण्यात येणार आहे. कोस्टा यांनी अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून गोव्यातील सोने तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या. नवाजुद्दीनचे चाहते त्याला या आगळ्या वेगळ्या, हटके अशा भूमिकेत बघण्यासाठी फारच उत्सुक आहेत.
आता लवकरच गोव्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. या सिनेमात कोस्टा फर्नांडिसच्या आयुष्यात घडलेल्या रोमांचक आणि नाट्यमय घटना दाखवल्या जाणार आहेत. कस्टम अधिकारी कोस्टा फर्नांडिज यांचे वर्णन एक 'दुर्मिळ नायक' म्हणून केले जाते. कोस्टा फर्नांडीज यांनी अनेक जीवावर बेतलेल्या अनेक घटनांचा सामना केलाय. याशिवाय गुन्हेगार आणि तस्करांसोबत झालेल्या चकमकींमुळे त्यांना लक्षात ठेवले जाते. कोस्टा फर्नांडिस हे गोवा कस्टम्समध्ये १९७९ मध्ये प्रतिबंधात्मक अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या आयुष्यावर आधारीत येणारा हा सिनेमा नक्कीच रंजक असेल.