ऋषी कपूर यांची चौथी पुण्यतिथी आहे. चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ऋषी कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांचेच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांच्याही डोळ्यात पाणी आले. ऋषी कपूर दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते आणि अखेरीस 30 एप्रिल 2020 रोजी त्यांना कर्करोगाशी लढा संपला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला.
आज त्यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे चाहते त्यांचे स्मरण करत श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची पत्नी नीतू कपूरआणि मुलगी रिद्धिमा कपूर यांनीही एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
नीतू कपूरने स्वतःचा आणि ऋषी कपूरचा एक अनसीन फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नीतू निळ्या रंगाच्या टॉपमध्ये तर ऋषी कपूर ब्लेझरमध्ये दिसत आहेत. दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत आणि हसत हसत कॅमेरासमोर पोज देत आहेत. हा फोटो शेअर करताना नीतूने एक भावनिक कॅप्शनही शेअर केले आहे. त्यांनी लिहिलंय, "4 वर्ष झाली." आता तुमच्याशिवाय आमच्यासाठी आयुष्य पहिल्या सारखे नाही.'' नीतू कपूरच्या पोस्टवरून तिचे संपूर्ण कुटुंब ऋषी कपूरला किती मिस करते, याचा अंदाज येऊ शकतो.
याशिवाय त्यांची मुलगी रिद्धिमानेही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक खास पोस्ट शेअर करून वडिलांचे स्मरण केलं आहे. रिद्धिमाने ऋषी कपूरसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि एक चिठ्ठी लिहिली, "जे आम्ही प्रेम करतो ते कधीच आमच्यापासून दूर जात नाहीत. ते रोज आमच्यासोबत असतात. मला तुमची खूप आठवण येते."
नीतू कपूरचे जावई भरत साहनी यांनी इन्स्टा स्टोरीवर फॅमिली फोटो शेअर करून सासऱ्यांची आठवण काढली . भरतने कॅप्शनमध्ये लिहिले की, "सुंदर आठवणींसाठी धन्यवाद. आम्हाला तुमची खूप आठवण येते." याशिवाय कुटुंबीय आणि मित्रमंडळीही खास पोस्ट शेअर करून ऋषी कपूर यांची आठवण काढत आहेत. नीतू कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीवर या सर्व पोस्ट शेअर केल्या आहेत.
चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत नीतू कपूरच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि ऋषी कपूर यांची आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.