नीतू कपूर लवकरच करण जोहरच्या 'कोफी विथ करण ८' च्या चॅट शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये त्यांनी अनेक वैयक्तिक गोष्टींचा खुलासा केला. तसेच इंडस्ट्रीतील सेलिब्रेटींबद्दलही काही विचित्र गोष्टी सांगितल्या.
जया बच्चन आणि पापाराझी यांच्यातील भांडणांबद्दल बोलताना नीतू कपूर यांनी करण जोहरला सांगितले की, 'मला वाटते की जया जी हे सर्व मुद्दाम करतात, ते एकदा तसं झालेलं ना, म्हणून तेच आता त्या परत परत करतात. पण खेरतर त्या अशा रागीट अजिबात नाहीत.
नीतू कपूरच्या या बोलण्यावर करणनेही सहमती दर्शवली. तो म्हणाला, ' हो त्या अजिबात तशा नाहीत. त्या खूप गोंड स्वभावाच्या आहेत. पापाराझी त्यांना घाबरातात. त्या येतात आणि आता पुरे झालं म्हणतात, या सर्व गोष्टींची आता पापाराझीही मजा घेऊ लागले आहेत.
यावर नीतू पुढे म्हणाल्या, जया जींनाही असं करायला मजा येते. त्यांच्या अशा वागण्यावर पापाराझीही खुश असतात. मला वाटते की ते दोघे एकमेकांना मिळालेले आहेत.