स्टार प्रवाह वरील मन उधान वाऱ्याचे या मालिकेत गौरीची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री नेहा गद्रे सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. नेहाने लग्नानंतर अभिनय क्षेत्राला निरोप दिला आणि आपल्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलियात राहायला गेली.
नेहाने फारसे काम केले नसले तरीही तिचा चाहता वर्ग मात्र बराच मोठा झालेला. ती अजूनही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या आयुष्याबाबत चाहत्यांना अपडेट देत असते.
परदेशी स्थायिक झालेली नेहा अद्याप आपली मूळ संस्कृती विसरलेली नाही. ऑस्ट्रेलियात राहूनही ती दिवाळी, दसरा, गणेशोत्सव यांसारखे सण मोठ्या उत्साहात साजरी करते. आता तिने ऑस्ट्रेलियात आपल्या नवऱ्यासह होळी साजरी केली आहे. ज्याबाबतचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.
ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन येते आयोजित केलेल्या होळी पार्टीत नेहा व तिच्या पतीने ही मजा केली. तिच्या या व्हिडिओवर अनेक युजर्स कमेंट करून तिला होळीच्या शुभेच्छा ही देत आहेत.
नेहाने मोकळा श्वास, झाली गडबड यांसारख्या सिनेमातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली. मात्र लग्नानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यावर तिने मनोरंजनसृष्टीला निरोप दिला. सध्या ती ऑस्ट्रेलियात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.