Close

‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत शिक्षिकेच्या भूमिकेतील सुरुची अडारकरच्या नव्या पेहेरावाची चर्चा (New Costumes Of Suruchi Adarkar, Playing The Role Of Modern Teacher In Series ‘Chhotya Bayochi Mothi Swapna’ Goes Viral)

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत आपल्याला बयोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहे. बयोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता या मालिकेत सुरुची अडारकर हिची एन्ट्री होणार आहे. अनू देसाई असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असून ती शिक्षिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येते आहे. ती पहिल्यांदाच शिक्षिकेच्या भूमिकेत टेलिव्हिजनवर येते आहे.

भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बयो आणि तिची आई भारती यांच्या आयुष्यात शुभंकरच्या येण्याने चांगले दिवस आणले. पण आता भारतीच्या जाण्याने बयोवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय शुभंकरदेखील बयोसोबत काही काळ नव्हता. या धक्क्यांतून बयो कशी सावरेल, तिला तिची स्वप्नं पूर्ण करता येतील का; हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे.

आता शिक्षिका अनू देसाईच्या येण्याने बयोच्या आयुष्यात काय बदल होतील, हे पाहायला मिळेल. बयोचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता कसे पूर्ण होईल. तिचा सगळ्यांत मोठा आधार तिच्यासोबत नसणार आहे आणि आता शुभंकर तिची काळजी कशी घेईल हेही पाहता येईल. आता शिक्षिका अनू देसाईच्या येण्याने बयोच्या आयुष्यात एक आशेचा किरण आला असून तिच्या येण्याने बयोला कशी मदत होईल, हे मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

सुरुचीच्या चाहत्यांसाठी तिला टेलिव्हिजनवर पुन्हा पाहणे हे मजेशीर असणार आहे. मालिकेत तिची एन्ट्री झाली आहे आणि आता बयोच्या आयुष्यातील हे वळण तिला पुढे कसे मदत करेल, हे पाहायला मिळेल. सुरुचीच्या नव्या पेहेरावाची चर्चा पाहायला मिळते आहे. शिक्षिकेच्या भूमिकेत ती पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर दिसते आहे.

Share this article