Close

 लग्नानंतर पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आले रणदीप हुडा आणि लीन लैश्राम, चाहत्यांनी केलं नवविवाहितांचं अभिनंदन (Newly Wed Couple Randeep Hooda And Lin Laishram Make Their First Appearance Post Wedding)

रणदीप हुड्डा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत होता. अखेर रणदीपने 29 नोव्हेंबर रोजी त्याची दीर्घकाळची मैत्रीण लिन लैश्रामसोबत लग्नगाठ बांधली. एका भव्य लग्नाऐवजी, अभिनेत्याने मणिपूरमध्ये अत्यंत साध्या आणि पारंपारिक पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. आता लग्नानंतर प्रथमच, रणदीप त्याच्या बायकोसोबत विमानतळावर दिसला. नवविवाहित जोडप्याची पहिली झलक पाहून चाहते खूश झाले आहेत.

काल रात्री रणदीप हुडा आणि लिन लैश्राम त्यांच्या लग्नानंतर मुंबईला परतले. मुंबई विमानतळावर प्रथमच हात हात घालून ते पोज देत होते.. यावेळी पापाराझींनी या जोडप्याला कॅमेऱ्यात कैद केले. या जोडप्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये रणदीप अतिशय रोमँटिक स्टाईलमध्ये त्याची वधू लिनचा हात धरताना दिसत आहे. विमानतळाच्या बाहेर येताच दोघांनी पॅप्सला रोमँटिक पोज दिल्या. लिनने लग्नानंतर तिच्या पहिल्या सार्वजनिक देखाव्यात लाल रंगाचा सूट परिधान केला होता तर रणदीप लग्नानंतर अगदी साध्या लूकमध्ये दिसला. तो सर्व पांढर्‍या लुकमध्ये खूप देखणा दिसत होता. दोघेही हात हातात धरलेले दिसले.

हा व्हिडिओ समोर येताच नवविवाहित जोडप्याला पाहून यूजर्स खूश झाले. बी-टाऊनची ही नवी जोडी सर्वांना पसंत पडली आहे. युजर्स दोघांच्या लग्नासाठी अभिनंदन करत आहेत.

29 डिसेंबर रोजी रणदीप हुड्डा यांनी मणिपूरमधील प्रेयसी लिन लैश्रामसोबत मेईतेई रितीरिवाजांनुसार लग्न केले. लग्नापूर्वी रणदीपने सांगितले होते की, त्याला लिनच्या परंपरेचा आदर करायचा आहे, म्हणून त्याने तिच्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर तिने इंस्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

लग्नानंतर रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम आता मुंबईत ग्रॅंड वेडिंग रिसेप्शनची तयारी करत आहेत, ज्यामध्ये अनेक फिल्मी सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. मात्र, रिसेप्शनची तारीख आणि इतर तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

Share this article