Close

इश्कबाज फेम सुरुभी चंदानाने शेअर केले लग्नाचे सुंदर फोटो (Newlyweds Surbhi Chandna Shares First Pics From Her Wedding, Says- Finally Home)

 इश्कबाज, नागिन आणि शेरदील शेरगिल यांसारख्या टीव्ही शोमध्ये दिसलेली सुरभी चंदना विवाहबंधनात अडकली आहे. तिने 2 मार्च रोजी तिचा प्रियकर करण शर्मासोबत जयपूरला लग्न केले. दोघांनीही कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पण आता, लग्नाच्या दोन दिवसांनंतर, अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.

1 मार्चपासूनच सुरभी आणि करणच्या लग्नाचे फंक्शन सुरू झाले होते. बांगड्या भरणे, मेहंदी, हळदी आणि सुफी नाईटच्या अनेक व्हिडिओंनी सोशल मीडिया धुमाकूळ घालत आहे.

लग्नाच्या दिवशी सुरभी खूप सुंदर दिसत होती आणि तिचा नवरा करण देखील खूप देखणा दिसत होता. सुरभीने लग्नात ऑलिव्ह ग्रीन कलरचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. नैसर्गिक मेकअप, मोकळे केस, दागिने, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या घातलेली सुरभी खूपच सुंदर दिसत होती. करण शर्माने सिल्व्हर ग्रे शेरवानी घातली होती आणि दोघेही लग्नानंतर खूप आनंदी दिसत होते.

लग्न झाल्यापासून चाहते तिच्या लग्नाच्या अल्बमची वाट पाहत असले तरी सुरभीने आता लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये वधू आणि वर लग्नाचे विधी करताना दिसत आहेत. सुरभीने फेरीपासून सिंदूर सोहळ्यापर्यंतचे फोटो शेअर केले आहेत.

लग्नानंतर दोघांनी एकत्र अनेक रोमँटिक पोज दिल्या आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसले.

हे फोटो शेअर करताना सुरभीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 13 वर्षांनंतर... हा नवा प्रवास सुरू करण्यासाठी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आवश्यक आहेत.

सुरभीच्या या वेडिंग अल्बमला सध्या सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. सेलेब्सपासून चाहत्यांपर्यंत नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले जात आहे.

सुरभी आणि करण १३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आणि अखेर 13 वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याने त्यांचे लग्न अगदी खाजगी ठेवले होते. एका मुलाखतीदरम्यान सुरभीने असेही सांगितले होते की, नात्याला नाव देण्यासाठीच ती लग्न करत आहे.

Share this article