Close

ओटीटी मंचावरील मालिकांची नामांकने घोषित; ‘हिरामंडी’ व ‘पंचायत’ मालिका अग्रक्रमावर (Nominations For OTT Platforms Unveiled : Web Series ‘Hiramandi’ And ‘Panchayat’ Toppers The List)

फिल्मफेअरने ओटीटी मंचावरील ॲवॉर्डस्‌ची नामांकने घोषित केली असून त्यामध्ये ‘हिरामंडी’ व ‘पंचायत’ या वेब सिरीज अग्रक्रमावर आहेत. त्यांना प्रत्येकी १६ नामांकने मिळाली आहेत. तर ‘गन्स ॲन्ड गुलाब’ला १२ आणि ‘मेड इन हेवन सीझन २' ला ७ नामांकने मिळाली आहेत. याशिवाय ‘खो गये हम कहां’ या चित्रपटास १४, ‘अमर सिंग चमकीलाला’ या चित्रपटाला १२ व ‘कडक सिंग’ला ११ नामांकने मिळाली आहेत.

राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, करीना कपूर, दिलजीत दोसांझ, परिणीता चोप्रा यांच्यासह अन्य कलाकारांचा नामांकनात विशेष उल्लेख आहे. नामांकनांच्या घोषणा प्रसंगी अभिनेत्री भूमी पेडणेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी राज निदिमोरु आणि कृष्णा डी.के. व फिल्मफेअरचे संपादक – प्रमुख जितेश पिल्लई हजर होते.

डॅन्युब प्रॉपर्टीज्‌ फिल्मफेअर ओटीटी ॲवॉर्डस्‌२०२४चे  सह-प्रायोजक ह्युंदाई मोटर्स असून अभिनेता अर्जुन माथुर, गगन देव रियार, के.के. मेनन, रितेश देशमुख यांच्यासह गीतांजली कुलकर्णी, नीना गुप्ता, रसिका दुगल, तिलोत्तमा शोम या अभिनेत्रींना नामांकने मिळाली आहेत. चित्रपट श्रेणीत जॅकी श्रॉफ, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, सिद्धांत चतुर्वेदी हे अभिनेता व अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, करीना कपूर खान, तब्बू, या अभिनेत्रींना नामांकने मिळाली आहेत.

"लहानपणापासून प्रतिष्ठीत ब्लॅक लेडी (फिल्मफेअर ट्रॉफी) मिळविण्याचे स्वप्न होते व आजही आहे," अशी भावना भूमी पेडणेकरने या प्रसंगी व्यक्त केली.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/