अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंह सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत रिमेक बनवताना कोणकोणत्या कठीण आव्हानांचा सामना करावा लागतो हे सांगितले. शाहिद कपूरच्या आधी रणवीर सिंहला ब्लॉक बस्टर चित्रपट 'कबीर सिंग' ऑफर करण्यात आला होता, असेही दिग्दर्शकाने सांगितले.
चित्रपट दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा त्यांच्या आगामी 'अॅनिमल' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार आहे. 'अॅनिमल' 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. आपल्या मुलाखतीत चित्रपट निर्माता संदीप रेड्डी वंगा यांनी खुलासा केला की कबीर सिंग या चित्रपटातील कबीरची भूमिका प्रथम रणवीर सिंगला ऑफर करण्यात आली होती. रणवीर सिंगने ही भूमिका डार्क शेड असल्याचे सांगत करण्यास नकार दिला. रणवीर सिंगनंतर चित्रपट निर्मात्याने कबीरच्या भूमिकेसाठी शाहिद कपूरशी संपर्क साधला.
आयड्रीम मीडियाला दिलेल्या मुलाखतीत 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक बनवण्याबाबत बोलताना चित्रपटाचे निर्माते संदीप रेड्डी वंगा म्हणाले, "अर्जुन रेड्डीचा रिमेक बनवण्यासाठी मला मुंबईतून फोन येत होते. यापूर्वी ही भूमिका रणवीर सिंगला देण्यात आली होती. कारण मला त्याच्यासोबत चित्रपट करायचा होता.पण रणवीरने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
कारण ती ग्रेशेडवाली भूमिका होती. जर रणवीरचा चित्रपट हिट झाला नसता तर त्याची खूप निराशा झाली असती. नंतर ही भूमिका शाहिद कपूरला ऑफर करण्यात आली आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
36 कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 380 कोटींची कमाई केली आणि आता संदीप वंगा त्यांचा पुढचा चित्रपट 'अॅनिमल'च्या रिलीजची वाट पाहत आहेत.