Close

लहान मुलांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक पोषण तत्त्वे (Nutrients To Enhance Immune Health In Children)

आरोग्यम्‌ धनसंपदा, असं आपण म्हणतो. पण पूर्णपणे आचरणात आणत नाही. आरोग्याची धनसंपदा राखण्यासाठी उत्तम, पोषक आहार आवश्यक आहे. विशेषत: लहान मुलांचे आरोग्य, त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांच्या आहारात आवश्यक त्या पौष्टीक घटकांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात ॲबॉटच्या न्यूट्रिशन बिझनेसच्या मेडिकल ॲन्ड सायंटिफीक अफेअर्सचे संचालक डॉ. गणेश काढे यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आवश्यक पोषण

१.    प्रथिन-संपन्न आहार : मुलांना वाढीच्या काळात प्रथिन-संपन्न आहारामुळे सर्वांगीण वाढीसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. त्यांच्या आहारामध्ये लीन मीट्स, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, शेंगा आणि काजू यांसारख्या स्रोतांचा समावेश करा.

२.    रंगीत फळे आणि भाज्या : आवश्यक जीवनसत्त्वे आणि मिनरल्स मिळण्यासाठी मुलांना विविध फळे व भाज्या सेवन करण्यास द्या. बेरी, गाजर आणि पालेभाज्या यांसारखी लक्षवेधक रंगीत उत्पादने दिसायला आकर्षक असण्यासोबत भरपूर पौष्टिक देखील असतात.

३.    वाढीसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी : हाडांच्या आरोग्यासाठी आणि सर्वांगीण वाढीसाठी कॅल्शियम व व्हिटॅमिन डीचे पुरेसे सेवन होत असल्याची खात्री करून घ्या. दुग्धजन्य पदार्थ, फोर्टिफाईड सेरेल्स आणि मुलांसाठी अनुकूल व्हिटॅमिन डी-युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करा.

४.    आतड्यांच्या आरोग्यासाठी फायबर : संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्या यांसारख्या फायबरयुक्त खाद्यपदार्थांसह संतुलित आहार सेवन केला जाण्याची खात्री करून घ्या. आतड्यांचे आरोग्य उत्तम असल्यास रोगप्रतिकारशक्ती प्रबळ होते.

पौष्टिक घटकांनी युक्त आहाराचे सेवन केल्यास दीर्घकाळापर्यंत रोगप्रतिकारशक्ती प्रबळ राहण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे जीवनशैली दीर्घकाळापर्यंत उत्तम राहण्याचा रोडमॅप तयार करता येऊ शकतो. या नववर्षात स्वतःच्या शरीराला उत्तम पोषण द्या, रोगप्रतिकारशक्ती वाढवा आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या अमर्याद संधींना अनलॉक करा.

Share this article