'माझी बायको सुनिता ही माझी चांगली मैत्रीण आहे. माझी प्रियतमा आहे अन् दोन मुलांची चांगली माता आहे. आमचे एकमेकांवर निरतिशय प्रेम आहे. अमूल्य असं हे प्रेम आहे, अशी भावना अभिनेता गोविंदाने करवा चौथ व्रताच्या निमित्ताने व्यक्त केली.
गोविंदा - सुनीताच्या लग्नाला ३५ वर्षे झाली आहेत. सुनीता दरवर्षी न चुकता करवा चौथचे व्रत करते. यंदाच्या वर्षी देखील तिने हे व्रत करून गोविंदाला दीर्घायुष्य लाभावे व त्याचा उत्कर्ष व्हावा अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली. चंद्रोदय होताच गोविंदाच्या हाताने पाणी पिऊन तिने उपवास सोडला.
Link Copied