बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवल्यानंतर आता संगीत क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. अलीकडेच परिणीतीने तिच्या रेकॉर्डिंग सेशनचे बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे.
एंटरटेनमेंट वेबसाइट पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व्यावसायिकरित्या संगीत क्षेत्रात प्रवेश करण्यास तयार आहे. लाइव्ह गाणारी ती पहिली अभिनेत्री असेल..
या नव्या उपक्रमाबद्दल अभिनेत्रीने उत्सुकता व्यक्त केली आहे. आणि आता परिणीती चोप्राने तिच्या रेकॉर्डिंग सेशनची पडद्यामागील झलक दाखवली आहे. या झलकमध्ये परिणीती चोप्रा आनंद आणि उत्साहाने परिपुर्ण दिसत आहे.
या क्लिपमध्ये परिणीतीने काळ्या रंगाचा छोटा ड्रेस परिधान केला असून, कानात हेडफोन आणि हातात मायक्रोफोन धरून गाताना दिसत आहे.
या क्लिपद्वारे अभिनेत्रीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. आणि कॅप्शनमध्ये लिहिले - माझ्या आत्म्यापासून स्टेजपर्यंत, लवकरच. अभिनेत्रीच्या या व्हडिओला बीटीएस चाहत्यांनी पसंती दिली आहे.