Close

विक्रांत-तापसीच्या ‘फिर आई हसीन दिलरुबा’चा जबरदस्त ट्रेलर (Phir Aayi Hasseen Dillruba Trailer)

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विक्रांत मेसी यांच्या ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा सिक्वल ‘फिर आई हसीन दिलरुबा’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चाहते या ट्रेलरवर फिदा झाले आहेत. या चित्रपटात आता दोन नवीन चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे.

ट्रेलरची सुरुवात होते ती राणीच्या डायलॉगने. रिशू आणि तिने आपल्या प्रेमासाठी काही वेड्यासारख्या गोष्टी केल्या आहेत असं ती म्हणते. नंतर विक्रांत म्हणतो, ‘मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकून घेईन पण अट एकच आहे, कुणी तिसरा व्यक्ती यात नकोय.’ त्यानंतर सनी कौशलची एन्ट्री होते. तो राणीच्या प्रेमात वेडा झाला आहे. राणीही त्याला आपल्या आयुष्यात येऊ देते. जसं रिशूहा राणीच्या नव्या अफेअरबद्दल माहिती होतं तो त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी निघतो. इथे मगरीच्या हल्ल्याचा एक सीन दाखवण्यात आला आहे तर शेवटी जिमी शेरेगीलच्या एन्ट्रीने नवीन ट्विस्ट येतो. तो म्हणतो की, ‘आता तो सगळे प्रश्न विचारणार आहे कारण या वेळेस प्रकरण थोडं पर्सनल आहे.’

ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने लिहिले, पहिला भाग मस्त होता आता दुसऱ्याची वाट पाहतोय. तर दुसऱ्या युजरने, विक्रांत पहिल्या पार्ट मध्ये मस्त होता आता दुसऱ्यात काय होतंय हे पाहण्यासाठी मी आतुर आहे, असे म्हटले आहे. चाहते या ट्रेलरचे कौतुक करत आहेत. फिर आई हसीन दिलरुबा हा चित्रपट कनिका ढिल्लो यांनी लिहिला आहे तर जयप्रसाद देसाई यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे.

Share this article