Close

पिझ्झा पनीर कुलचा (Pizza Paneer Kulcha)

किटी पार्टी, वीकेंड पार्टी किंवा बर्थडे पार्टीसाठी मुलांच्या मेनूमध्ये काही खास डिश समाविष्ट करायच्या असल्यास तुम्ही पिझ्झा पनीर कुलचा समाविष्ट करू शकता. चला तर मग पिझ्झा पनीर कुलचा ट्राय करूया.

साहित्य :

२ कुलचा

१-१ टेबलस्पून बटर आणि तेल

प्रत्येकी अर्धा कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची

अर्धा कप पनीर (लहान तुकडे करा)

अर्धा कप चीज (किसलेले)

प्रत्येकी अर्धा चमचा हळद, धने पावडर आणि तिखट

चवीनुसार मीठ

२ चमचे टोमॅटो केचप

पिझ्झा मसाला, चिली फ्लेक्स

कृती :

कढईत बटर आणि तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची मोठ्या आचेवर परतून घ्या.

चीज, सर्व पावडर मसाले आणि मीठ घालून ३-४ मिनिटे शिजवा.

कुलचावर टोमॅटो केचप लावा.

सारण पसरवा. चीज घाला आणि चवीनुसार पिझ्झा मसाला आणि चिली फ्लेक्स भूरभूरा.

दुसरा कुलचा झाकून ठेवा.

पॅनवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत बेक करा.

मधूनच कापून सर्व्ह करा.

Share this article