काल २ फेब्रुवारी रोजी सिनेसृष्टीत अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आली आणि एकच खळबळ उडाली. पण नवभारतटाइम्स डॉट कॉमला एका स्त्रोताने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्रीबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये ती जिवंत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच आता पुनम पांडेने एका इन्स्टा पेजवर लाइव्ह येत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
नुकताच पुनम पांडे च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ती लाइव्ह येत असल्याची पोस्ट शेअर करण्यात आली. त्यानंतर हाऊटरफ्लाय या पेजवर तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत तिने आपल्या निधनाची खोटी बातमी दिल्याबद्दल चाहत्यांची क्षमा मागितली आहे. ती म्हणाली की, मला माफ करा मी माझ्या मृत्यूची खोटी बातमी दिली. पण त्यामागे माझा उद्देश वेगळा होता. माझ्या निधनाच्या बातमीत जो सवाईकल कॅन्सरचा उल्लेख झाला तो तुम्ही तपसालात. हा आजार कसा होऊ शकतो त्याचे निदान काय याबद्दल तुम्ही सर्व तपासलेत.. हाच माझा मुळ उद्देश होता. हा असा आजार आहे जो हळूहळू तुमचे आयुष्य संपवू शकतो. आणि हा विषय समोर येणे गरजेचे होते. माझ्या मृत्यूच्या बातमीमुळे हा विषय चर्चेत आला याचा मला अभिमान आहे.
यापूर्वी काल पूनमच्या मृत्यूची बातमी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली, या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पूनमचा मृत्यू सवाईकल कॅन्सरमुळे झाला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ग्लॅमरस आणि सदृढ दिसणाऱ्या पूनमला अचानक कॅन्सर कसा काय होऊ शकतो असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.