Close

जुन्या जमान्यातील अतिशय गाजलेल्या संगीत नाटकावर बनवलेल्या ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित (Poster Released Of Musical Film “Sangeet Manapman” : Film Based On Old Classic Marathi Play)

जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान"चे पहिले पोस्टर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आले. यंदाच्या दिवाळीत म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी करताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आणि आता या पोस्टरमध्ये सुबोध भावेंचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि पेहराव पाहता या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीवरून प्रेरित, “संगीत मानापमान" हा संगीतमय चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज होणार आहे.

Share this article