Close

गरोदरपणात दीपिका पादुकोणला काय खावंसं वाटतंय? तिच्या मते डाएट म्हणजे काय? (Pregnant Deepika Padukone Is Eating This In Seventh Month Of Pregnancy)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. तिच्या प्रेग्नेंसीमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. गरोदरपणातील प्रत्येक गोष्टी ती आनंदाने जगताना दिसतेय. गरोदर असल्याची घोषणा केल्यापासून दीपिका तिच्या चाहत्यांसाठी तिच्या रुटीनची अपडेट इन्स्टाग्रामवर देत असते. चाहत्यांनाही तिच्याशी संबंधित अपडेट जाणून घ्यायचे असतात. नुकतंच दीपिकाने एक पोस्ट शेअर करत तिला काय खायला आवडतंय हे सांगितलं आहे शिवाय डाएट शब्दाबाबतचे गैरसमजही तिने दूर केले आहेत.

आताही दीपिकाच्या अशाच एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खाद्यपदार्थांचा फोटो शेअर केलाय. यात व्हिप्ड क्रिमने सजवलेला पॅनकेक, आईस्क्रीमसह ब्राऊनी आणि चटणीसोबत समोसा दिसत आहे.

हा फोटो शेअर करत तिने माहितीपूर्ण कॅप्शनही दिलंय. यात दीपिकाने सुरुवातीलाच लिहिलंय – “काय? माझ्या फीडवर हा फोटो पाहून सरप्राईज झालात ना? त्यापुढे दीपिकाने लिहिलंय की, बाबांनो, मी खाते आणि भरपूर खाते. मला ओळखणाऱ्या कुणालाही तुम्ही विचारू शकता. त्यामुळे तुम्ही इतर काही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. फीट राहण्याची ट्रीक म्हणजे – समतोल, सुसंगत आणि शरीराचं ऐकून त्याला झेपेल तितकंच खावं.”

दीपिकाने पुढे लिहिलंय, डाएटबद्दल खूप चुकीच्या धारणा आहेत. अनेकांना वाटतं की, डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं, कमी खाणं किंवा ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही, त्या सर्व बळजबरीने खाणं. पण तसं नाही आहे. पण डाएटचा खरा अर्थ आहे, कोणत्याही व्यक्तीद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या भोजनाची एकूण मात्रा.  हा शब्द ग्रीक भाषेतील ‘Diaita’ वरून घेण्यात आलेला आहे, ज्याचा अर्थ जीवनाचा मार्ग असा आहे. मी कधीच असा डाएट केला नाही ज्यात सातत्य बाळगू शकणार नाही. दीपिकाची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

दीपिका सध्या सात महिन्यांची गरोदर आहे आणि सप्टेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार आहे. गरोदर असल्याने दीपिका सध्या रजेवर आहे.

Share this article