Close

देसी गर्ल प्रियांका चोप्राची लेक सेल्फी काढायला शिकली, अभिनेत्रीने क्युट फोटो केले शेअर (Priyanka Chopra And Nick Jonas Daughter Malti Marie Learns To Click Selfies, Actress Shares Cute Pictures)

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची मुलगी मालती मेरी १५ जानेवारीला दोन वर्षांची होणार आहे, पण या वयात मालतीने एक नवीन छंद जोपासला आहे, आता मालतीने तिच्या पालकांच्या फोनवरून सेल्फी काढण्यास सुरुवात केली आहे.

प्रियांकाने मालतीने क्लिक केलेले हे सेल्फी तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केले आहेत. जे वेगाने व्हायरल होत आहेत, प्रियांकाने शेअर केलेले हे फोटो थोडे धुसर आहेत. काहींमध्ये मालतीचा अर्धाच चेहरा दिसतोय पण सगळ्यांना तिचा गोंडसपणा आवडला आहे.

कारमधून प्रवास करताना हे सेल्फी क्लिक करण्यात आले असून मालतीने काही सेल्फी घेतल्याचे अभिनेत्रीने लिहिले आहे. या फोटोंमध्ये मालतीची गोंडस हेअरस्टाईल दिसत आहे ज्यात तिची छोटी पोनी आणि क्लिप लावलेली पाहायला मिळते. चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत आणि ते मालतीला सेल्फी क्वीन म्हणत आहेत.

अलीकडेच निक आणि प्रियांकानेही मालतीसोबत त्यांचे हॉलिडे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये मालती क्यूट अॅक्टिव्हिटी करताना दिसली होती.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका शेवटी बॉलीवूड चित्रपट द स्काय इज पिंकमध्ये दिसली होती त्यानंतर ती तिच्या हॉलिवूड सिनेमांमध्ये व्यस्त झाली.

Share this article