प्रियांका चोप्राचा भाऊ, सिद्धार्थ चोप्रा आणि तिची आई, मधु चोप्रा यांनी पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेला एक बंगला सह-रहिवासी आणि सहकारी संस्था, द अर्बन नोमॅड्स कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भाड्याने दिल्याचं वृत्त आहे, सिद्धार्थ आणि मधु यांनी २१ मार्च रोजी नोंदणीकृत अर्बन नोमॅड्स कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेडसोबत एग्रीमेंट केलं आहे. कागदपत्रांच्या आधारे, फर्मने ₹६ लाख इतकं डिपॉजिट ठेवलं आहे आणि मासिक भाडं ₹२.०६ लाख भरणार आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असणाऱ्या या बंगल्याचा आकार ३७५४ वर्गफूट आहे. ग्राऊंड फ्लोअर २१८० वर्ग फूट, बेसमेंट एरिया ९५० वर्ग फूट आहे आणि गार्डन एरिया २२३२ वर्ग फूट आहे. पार्किंग एरिया ४०० वर्ग फूट आहे.
प्रियंकाचे मुंबईमध्ये दोन पेंट हाऊस होते, ते तिने विकले होते. दोन्ही पेंटहाऊस ओशिवरा, अंधेरी, मुंबईमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आहे. त्याचे क्षेत्र २२९२ वर्ग फूट आहे. तिने दोन्ही पेंट हाऊस सहा कोटींमध्ये विकले होते. प्रियंका चोप्राने याआधी अंधेरीच्या लोखंडवालामध्ये एक कमर्शिअल प्रॉपर्टी देखील ७ कोटींमध्ये विकली होती. अभिनेत्रीने एका डेंटिस्ट कपलला विकलं होतं. त्यांनी आधी २०२२मध्ये ही जागा भाड्याने दिली होती.