'द जोनास ब्रदर्स'ने मुंबईतील लोलापालूझा म्युझिक फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी आपल्या दमदार परफॉर्मन्सने शो मध्ये उपस्थितांची मनं जिंकली. निक जोनास, जो जोनास, केविन जोनास यांनी प्रेक्षकांसमोर त्यांची हिट गाणी गायली. प्रियांका चोप्राचा पती निकनेही चाहत्यांना सरप्राईज दिले. त्याने 'मान मेरी जान...' गायले तेव्हा लोक उड्या मारून 'जिजू जीजू' ओरडू लागले.
निक जोनास, केविन जोनास आणि जो जो जोनास यांनी शनिवारी मुंबईतील लोलापालूजा इंडिया म्युझिक फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी सादरीकरण केले. हा त्यांचा भारतातील पहिला क़न्सर्ट होता.
Can’t get enough of this performance.. Tu Maan Meri Jaan🔥🔥#NickJonas #JonasBrothers #LollaIndia pic.twitter.com/LpbFGQvli6
— PRINCESS✨|| MANNARA FTW (@PriyankaAnomaly) January 27, 2024
निक जोनासचा व्हिडिओ व्हायरल
निक जोनासने आपल्या भावांसोबत हिट गाणी गायली. यानंतर त्याने 'तू मान मेरी जान...' देखील गायले, ज्यावर लोक नाचू लागले. सगळ्यांना इतका आनंद झाला की ते त्याला प्रेमाने 'जिजू जिजू' म्हणू लागले. निकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात मेट गाला 2017 मध्ये झाली. डेटींगनंतर दोघांनी 2018 साली उम्मेद भवन पॅलेसमध्ये ग्रँड वेडिंग केले होते. 2022 मध्ये सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरीचा जन्म झाला. प्रियांकाच्या 'लव्ह अगेन' चित्रपटात निकने छोटी भूमिका केली होती.