प्रियांका चोप्रावर आर्थिक संकट कोसळले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत तिच्याकडून किंवा कुटुंबीयांकडून कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
२ डिसेंबर २०१८ साली जोधपुरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलिवूड गायक निक जोनासशी लग्न केले. लग्नानंतर प्रियांका अमेरिकेत शिफ्ट झाली. सध्या हे कपल लॉस एंजलिसमध्ये आलिशान घरात राहात आहे. पण ‘एनबीटी’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रियांकाने २० मिलियन डॉलर किंमत असलेले म्हणजेच १४९ कोटी रुपयांचे लॉस एंजलिसमधील घर खाली केले आहे. प्रियांकावर आर्थिक संकट कोसळल्यामुळे तिने हे घर गहाण ठेवले असल्याचे म्हटले जात आहे. प्रियांकाला दर महिन्याला या घराचे १ लाख डॉलर इतकी रक्कम भरावी लागत होती. त्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. सध्या प्रियांकाला ही रक्कम भरणे थोडे कठीण झाल्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
प्रियांकाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहिले तर ती कायमच या घरातील फोटो शेअर करताना दिसायची. पण गेल्या काही दिवसांपासून प्रियांकाने घरातील एकही फोटो शेअर केलेला नाही. या घरात गृहप्रवेश केल्यानंतर प्रियांकाने दिवाळी हा सण मोठ्या थाटामाट साजरा केला होता. होळीला जवळच्या मित्रपरिवाराला देखील या घरी बोलावले होते. स्विमिंगपूलमध्ये उड्या मारतानाचे फोटो तिने शेअर केले होते. आता प्रियांकाने हे घर गहाण ठेवल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
५ जानेवारी २०२१ रोजी प्रियांकाने या घरात गृहप्रवेश केल्याचे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले होते. तिने पती निक जोनाससोबत या घरात पूजा केली होती. यावेळी प्रियांकाच्या देसी अवतारने सर्वांचे लक्ष वेधले होते. २०१९ पासून प्रियांका आणि निक नव्या घराचा शोध घेत होते. २०१९मध्ये तिने २० मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच १४९ कोटी रुपयांचे हे लॉस एंजलिसमधील घर खरेदी केले होते. मात्र, आता प्रियांकाने हा बंगला सोडला असून नवे घर खरेदी केल्याचे समोर आले आहे.
प्रियांका चोप्राने नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका खोलीत बसली आहे. तसेच तेथे मोठी खिडकी आहे. तेथे टेबल आणि खुर्ची देखील दिसत आहे. सोबतच बाहेरील सुंदर देखावा दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये पंकज उधास यांचे 'आहिस्ता' हे गाणे वाजताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने 'पावसाळा माझ्यासाठी खूप खास असतो. कोणा कोणाला हे गाणे लक्षात आहे?' असे कॅप्शन दिले आहे. प्रियांका या नव्या घरात किती दिवस राहणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
२० मिलियन डॉलर किंमत असलेले म्हणजेच १४९ कोटी रुपयांचे लॉस एंजलिसमधील घर खाली केले. या घरात पाण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे प्रियांकाने हे घर सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. प्रियंकानं ज्या एजंटकडून घर घेतले होते त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्याची बातमी समोर आली आहे. प्रियंकानं तब्बल १४९ कोटी रुपये मोजून नवीन घर खरेदी केले होते. मात्र त्या घराला काय ग्रहण लागले हे माहिती नाही. त्या घरात पाण्याची गळती सुरु झाल्याचे प्रियंकाचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे प्रियंका आणि निकला त्यांचे राहते घर सोडावे लागले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंकाच्या दुसऱ्या नव्या घराचे काम सुरु असताना तिथे तिला मुलगी मालतीसह राहायला जावं लागलं आहे.
प्रियांकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर २०२३मध्ये तिचा 'लव अगेन' हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यापाठोपाठ आता तिचा 'हेड्स ऑफ स्टेट' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रियांका बॉलिवूडपासून लांब आहे. २०१९ साली ती 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात दिसली होती. आता तिच्या बॉलिवूड चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.