देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि रॉक स्टार निक जोनासची मुलगी मालती मेरी 15 जानेवारी रोजी 2 वर्षांची झाली. या जोडप्याने लॉस एंजेलिसमध्ये मोठ्या थाटामाटात आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
पण आता अभिनेत्रीने काही नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात मालती मंदिरात देवीच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसते. प्रियांका परदेशात राहूनही ती आपल्या मुलीवर हिंदू संस्कार करत असते. कोणताही सण असला की, ती घरी आवर्जून पूजा करते आणि ती प्रत्येक हिंदू सण साजरी करते.
याच कारणामुळे ती आपल्या मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाला लॉस एंजेलिसच्या मंदिरात गेली होती. निक आणि तिची आई मधू चोप्राही तिच्यासोबत होते.
प्रियांकाने देवीसमोर हात जोडल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. निक आपल्या मुलीला कुशीत घेऊन देवीचे दर्शन देत आहे. मधू चोप्रा देखील भक्तीमध्ये तल्लीन दिसत आहेत.
इतर फोटोत मालती मंदिराच्या आवारात गळ्यात हार घालून खेळताना दिसत आहे, तर एका फोटोत प्रियांका देवीच्या मूर्तीजवळ जाऊन मालतीला दर्शन आणि आशीर्वाद देताना दिसत आहे.
याशिवाय, अभिनेत्रीने सेलिब्रेशनचे आणि बीचवर हँग आउट करतानाचे फोटोही शेअर केले आहेत.