प्रियांका चोप्राचे चाहते तिच्या बॉलिवूडमधील पुनरागमनाची वाट पाहत होते. अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण होणार आहे. कारण प्रियांका चोप्रा लवकरच संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करणार आहे.
बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेमध्ये आहे. जवळपास ५ महिन्यांनंतर प्रियांका चोप्रा मायदेशी आली आहे. मागच्या आठवड्यात गुरुवारी प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत भारतामध्ये आली. भारतामध्ये आल्यानंतर प्रियांका चोप्राने आपल्या कुटुंबीयांसोबत अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतलं. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता प्रियांका चोप्राबाबत नवीन बातमी समोर आली आहे. प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे.
मायदेशी येताच तिच्या हाती बिग बजेट चित्रपट लागला आहे. प्रियांका चोप्रा लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये काम करणार असल्याची चर्चा सुरू आहे. प्रियांका चोप्राचे चाहते देखील तिच्या बॉलिवूडमधील पुनरागमनाची वाट पाहत होते. अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण होणार आहे. कारण प्रियांका चोप्रा लवकरच संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करणार आहे. यासाठी दोघांमध्ये चित्रपटाबाबत चर्चा देखील सुरू आहेत. प्रियांका चोप्रा संजय लीला भन्साळी यांच्या पीरियड ॲक्शन चित्रपटात दिसणार आहे. पण आत्तापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही.
संजय लीला भन्साळी आणि प्रियांका चोप्राच्या पुढील चित्रपटाची बातमी कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. प्रियांका चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांनी याआधीही 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात प्रियांका चोप्राने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. प्रियांका चोप्रा आता संजय लीला भन्साळींच्या चित्रपटामध्ये नेमकी काय भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, प्रियांका चोप्रा आपल्या कामातून १० दिवसांचा ब्रेक घेऊन भारतामध्ये आली आहे. प्रियांका मुंबईमध्ये इंटरनॅशनल ज्वेलरी ब्रँड बुल्गारीच्या मुंबई स्टोअरच्या उद्घाटनासाठी भारतात आली होती. या ज्वेलरी ब्रँडने प्रियांका चोप्राला उद्घाटनासाठी स्पेशल गेस्ट म्हणून बोलावले होते. हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर प्रियांका चोप्रा आपल्या कुटुंबीयांसोबत अयोध्येला गेली आणि तिने सहकुटुंब रामल्लाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. यावेळी प्रियांकाने साडी नेसली होती. तर निक आणि मालती देखील पारंपारिक लूकमध्ये दिसले.