बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर लॉस एंजेलिसमध्ये राहते. परंतु एखाद्या खास प्रसंगी ती भारतात यायला विसरत नाही. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाला प्रियांका हजेरी लावणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र काही कारणास्तव ती येऊ शकली नाही. यानंतर आता पुन्हा एकदा प्रियांका चोप्रा भारतात येणार असल्याची बातमी समोर येत आहे. प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक स्टोरी शेअर केली आहे. त्यानंतर या चर्चेला जोर आला आहे.
निक जोनासची पत्नी आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा काही महिन्यांपूर्वी आपली मुलगी मालती मेरीसोबत भारतात आली होती. या दरम्यान प्रियांका चोप्रा आणि तिची मुलगी मालती मेरीचेही अनेक फोटो व्हायरल झाले होते. यानंतर प्रियांका चोप्रा पुन्हा भारतात येणार आहे.
अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने भारतीय पासपोर्ट आणि फ्लाइट बोर्डिंग हातात घेतलेले दिसते. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने एका गोंडस इमोजीसह मुंबई असे लिहिले आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्रा MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतात येत आहे. या इव्हेंटची ओपनिंग नाईट प्रियांका होस्ट करणार आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रियांका चोप्रा भारतात आल्याच्या बातमीने चाहते खूप खूश दिसले. प्रियांका चोप्रा शेवटच्या वेळी भारतात आली तेव्हा तिच्यासोबत तिची मुलगी मालती मेरीही दिसली होती. पण यावेळी मालती मेरी त्यांच्यात सामील होणार आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही.