बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे वा तिच्या व्हिडिओमुळे नेहमी चर्चेत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हा सतत चर्चेत आहे. राज कुंद्राचा UT 69 हा चित्रपट काही दिवसात रिलिज होणार आहे. राज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.
UT 69 हा राज कुंद्राचा बायोपिक आहे. या चित्रपटात त्याने आर्थर रोड तुरुंगात घालवलेल्या दिवसांची स्टोरी सांगितली आहे. राजला जुलै २०२१ मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळेस दोन महिने राज तुरुंगात राहिला होता. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला अन् त्यानंतर लगेचच राजने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने लिहिले होते की,'आम्ही वेगळे होत आहोत आणि मी तुम्हाला विनंती करतो की या कठीण काळात आम्हाला एकटं सोडा.'
या ट्विटनंतर सोशल मिडियावर फक्त राजचीच चर्चा होती शिवाय शिल्पानं देखील या पोस्टवर काही कमेंट केली नव्हती. अनेकांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर लोकांना वाटले की, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे विभक्त झाले. मात्र, आता यासंदर्भात अत्यंत मोठा खुलासा झालाय.
गेल्या दोन वर्षांपासून राज कुंद्रा हा मास्क घालूनच बाहेर फिरत होता. आम्ही वेगळे झालो हे राज कुंद्रा त्याच्या मास्कबद्दल बोलत होता. नुकताच राज कुंद्रा याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओत राज वेगवेगळ्या मास्कमध्ये दिसत आहे.
या पोस्टमध्ये राजने लिहिले की, 'फेअरवेल मास्क... २ वर्षांपासून माझे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद, आता वेगळे होण्याची वेळ आली आहे.' त्याच्या या पोस्टवर आता नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर राजने घटस्फोटाच्या चर्चांना पुर्णविराम देत शिल्पासोबतचा एक व्हिडिओही शेयर केला आहे.
दरम्यान प्रेक्षक राज कुंद्राचा UT 69 पाहण्यास खूपच उत्सुक आहेत.