Close

राखी सावंतने अंकिता लोखंडेच्या सासूला म्हटले कैकयी! नवराबायकोत न पडण्याचा मोलाचा सल्ला (Rakhi Sawant Called Ankita Lokhande’s Mother-In Law ‘Kaikeyi …, She Win Bigg Boss 17)

- बॉलिवूडची ड्रामा क्वीन सावंतने बिग बॉस-17 मधील स्पर्धक विक्की जैनच्या आईला 'कैकयी' म्हणून संबोधले आहे. एवढेच नाही तर राखीने ती अंकितासोबत असल्याचेही सांगितले. तसेच जेव्हा अंकिता बिग बॉस-17 जिंकेल तेव्हा ती आनंदोत्सव साजरा करेल असे म्हणाली.

ड्रामा क्वीन राखी सावंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेची सासू रंजना जैन यांच्यावर जोरदार टीका करत आहे. काल, अभिनेत्रीने अंकिता लोखंडेचा पती विकी जैनच्या आईला रामायणाची कैकेयी बनू नका आणि अंकिता आणि तिचा पती विकी यांच्यात मध्ये पडू नका असा सल्ला दिला.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, बोलताना राखी रंजना जैनला उद्देशून म्हणतेय- विकी आणि अंकिता विवाहित आहेत. तुम्ही त्यांच्या भांडणात का येताय? सासूबाई, काय करताय असं? शांत राहा, चांगले अन्न खा, आपल्या जीवनाचा आनंद घ्या. हे सगळं का करत आहेस?

मुद्दा पुढे नेत राखी म्हणते – अंकिता ट्रॉफी जिंकेल, ती बिग बॉस-17 जिंकेल. हा माझा अंदाज आहे. आमची मराठी मुलगी अंकिता हा शो जिंकणार आहे. त्यानंतर तुम्ही आनंद साजरा कराल आणि म्हणाल - माझी सून जिंकली आहे. म्हणूनच सांगते असं करू नकोस - अंकिताच्या सासूबाई. तुमचा मुलगा आणि सून यांच्यात जास्त बोलू नका. माझ्या घरातही खूप भांडण व्हायचे. माझ्या आईने कधीही हस्तक्षेप केला नाही. फक्त तुमच्या सुनेचा आदर करा, मग बघा लोक तुमच्या सुनेचा कसा आदर करतील.

राखीने असेही म्हटले आहे - आम्ही सर्वजण अंकितावर खूप प्रेम करतो. ती माझी बहिण आहे. मी तुमच्या घरी आले आणि तुम्हाला भेटले, आठवते? मला वाटलेले तूम्ही देवासारख्या आहात, पण मग तुम्ही अशा अचानक कशा काय झालात? आई, कैकेयी होऊ नका, घर बांधा, घर तोडू नका.

Share this article