Close

‘रामजन्मभूमी : रिटर्न ऑफ ए स्प्लेंडिड सन’ या माहितीपटाला विक्रमी प्रतिसाद; पहिल्याच आठवड्यात मिळाले ३.५ दशलक्ष व्ह्यूज (‘Ram Janmabhoomi : Return Of A Splendid Sun’ Gets Thundering Response : First Documentary To Get Trendy On All OTT Platforms)

भारताला लाभलेल्या अत्यंत वैभवशाली सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या  ‘रामजन्मभूमी : रिटर्न ऑफ ए स्प्लेंडिड सन’  या माहितीपटाच्या यशानिमित्त एका कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्हीआयपी इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष दिलीप पिरामल आणि प्रसिद्ध लेखक तथा या माहितीपटाचे सूत्रसंचालक अमिश त्रिपाठी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. २५ जानेवारी २०२४ रोजी हा माहितीपट प्रसारीत करण्यात आला होता.  हा माहितीपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून पहिल्याच आठवड्यात या माहितीपटाला ३.५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.   सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ट्रेंडींग कंटेटमध्ये या माहितीपटाने तिसरा क्रमांकावर झेप घेतली आहे. दिलीप पिरामल, इम्मॉर्टल स्टुडिओ (प्रसिद्ध लेखक, माजी मुत्सद्दी आणि माहितीपटाचे सूत्रसंचालक अमिश यांनी स्थापन केलेला स्टुडियो) आणि कासा मीडिया द्वारे निर्मित माहितीपटामध्ये राम जन्मभूमीच्या संपूर्ण इतिहासाचा आणि सखोल सांस्कृतिक प्रभावासंदर्भात करण्यात आलेल्या विस्तृत संशोधनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

या माहितीपटात भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी सरन्यायाधीश बोबडे, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, प्रसिद्ध संगीतकार उस्ताद अमजद अली खान, मालिनी अवस्थी, प्रतिष्ठित पुरातत्वशास्त्रज्ञ बी.आर.मणी आणि के.के.मोहम्मद यांच्या मुलाखती समाविष्ट करण्यात आल्या आहेत.  याशिवाय इतिहासकार मीनाक्षी जैन, नामवंत पत्रकार मधु त्रेहन यांच्याही मुलाखती या माहितीपटामध्ये पाहायला मिळतात.

या माहितीपटाचे दिग्दर्शन नितीश शर्मा आणि प्रणव चतुर्वेदी यांनी केले आहे. माहितीपटाच्या शीर्षक गाण्याला ग्रॅमी-पुरस्कार विजेते रिकी केज यांनी संगीत दिले असून हे गाणे सोनू निगम आणि मालिनी अवस्थी या प्रतिभावंत गायकांनी गायले आहे.

या माहितीपटाच्या यशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कौतुक सोहळ्याला रिकी केज, कबीर बेदी, इला अरुण, रवी दुबे, अमित टंडन, अश्विन सांघी यांनी हजेरी लावली होती. त्यांची उपस्थिती या माहितीपटाचे आणि त्याला मिळालेले अभूतपूर्व यश अधोरेखित करणारी ठरली.

दर्शकांना या माहितीपटातून रामजन्मभूमीचे ऐतिहासिक महत्त्व, प्रभू रामाचे जीवन आणि भारतावरील या सगळ्याच्या सांस्कृतिक प्रभावाचा सखोल शोध घेण्यात आला आहे. भारतीय इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची घटना असून प्रभू श्रीराम अयोध्येत परतले तो क्षण आपण दुसरी दिवाळी म्हणून का साजरा करणे गरजेचे आहे याचे महत्त्व सांगणारी आहे.  अमिश यांनी सांगितलेली कथा, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि विचार करायला लावणाऱ्या विषयांसह राम मंदिराचा आतापर्यंतचा प्रवास आणि त्याची कहाणी ही ठळकपणे प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे.  रामजन्मभूमी मंदिराची सुरुवातीपासून आतापर्यंतची संपूर्ण कथा समजून घेण्यासाठी हा माहितीपट पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

https://youtu.be/-70mAhC-pw4?si=t3VsLvBAxJY88zZZ

या माहितीपटाच्या सक्सेस स्क्रिनिंगला उत्तम प्रतिसाद लाभला. उत्तम कथानक, त्याची सुरेख मांडणी, सखोल संशोधनाच्या आधारे सादर करण्यात आलेली गोष्टी आणि उत्तम निर्मिती यामुळे हा माहितीपट अत्यंत रंजक झाला आहे. या माहितीपटाला आधीच उदंड प्रतिसाद लाभला असून हा माहितीपट सोशल मीडिया मंचावर ट्रेंडींग झाला आहे. भारतीय संस्कृतीबद्दल सकारात्मक चर्चेला या माहितीपटामुळे बळ मिळाले आहे. 

‘रामजन्मभूमी : रिटर्न ऑफ अ स्प्लेंडिड सन’ हा माहितीपट जिओ सिनेमावर उपलब्ध असून हा माहितीपट हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांत उपलब्ध आहे. अमिश यांचे कथावर्णन हे देखील या दोन्ही भाषांत उपलब्ध आहे.

Share this article