सध्या राम मंदिराच्या उद्घाटन तयारी सर्वत्र जोरदार सुरु आहे. देशभरातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींना निमंत्रण पोहचली आहेत. १७ जानेवारीला बहुतांश सेलेब्रिटी अयोध्येत पोहचले, त्याची एक झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली.
रामायण मालिकेतील प्रमुख कलाकार अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी हे देखील बुधवारी अयोध्येत गेले आहेत.
मात्र लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसलेल्या सुनील लहरी यांना अयोध्यात काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ते म्हणाले की, अयोध्येकडे पाहून विश्वास बसत नाही की हे तेच शहर आहे जिथे आम्ही दोन वर्षांपूर्वी शूटिंगसाठी आलो होतो.
इथे बरेच काही बदलले आहे. विशेषत: येथील वाऱ्यातही तुम्हाला ऊर्जा जाणवू शकते. रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने, घरे या सर्वांमध्ये भक्तीमय वातावरण आहे. शहर अतिशय स्वच्छ झाले आहे.
पण येथील एक समस्या म्हणजे हॉटेलमध्ये बुकिंग मिळत नाहीये. इथली सर्व हॉटेल्स बुक केलेली आहेत. कुठेही रुम्स रिकाम्या नाहीत. त्यामुळे रुम उपलब्ध नसेल तर दर्शन कसे घ्यावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता असं वाटतय की श्रीरामांनी मला तिथे बोलावले आहे म्हणजे नक्कीच रुमचीही व्यवस्था होईल.